INDIA vs UAE: जसप्रीत बुमराह OUT, संजू सॅमसन फिनिशर; युएईविरुद्धात कशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11?

INDIA vs UAE Predicted Playing-11: भारतीय क्रिकेट संघ आशिया कपमध्ये आपले जेतेपद राखण्यासाठी सज्ज आहे. २०२३ चा विजेता संघ १० सप्टेंबर रोजी संयुक्त अरब अमिराती (यूएई) विरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
INDIA vs UAE
INDIA vs UAE Predicted Playing-11saam tv
Published On
Summary
  • भारताचा सामना युएई संघासोबत होणार आहे.

  • हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

  • युएईमध्ये भारताला कवडी झुंज देण्याची क्षमता

आशिया कपमध्ये आपलं विजेतेपद कायम ठेवण्यासाठी टीम इंडिया सज्ज झालीय. भारतीय संघ आपल्या मोहिमेची सुरुवात संयु्क्त अरब अमीरातच्या विरुद्धात करणार आहे. भारताचा सामना युएई संघासोबत होणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारतीय संघाचा फॉर्म पाहता हा संघ ही स्पर्धा जिंकण्याचा प्रबळ दावेदार आहे. दरम्यान युएई संघ कमकुवत संघ वाटत असला तरी भारताला कवडी झुंज देण्याची क्षमता या संघात आहे.

INDIA vs UAE
Sara Tendulkar: सचिनची लेक सारा तेंडुलकर पुन्हा चर्चेत; फोटोतील तो मराठी मुलगा कोण?

परफेक्ट प्लेइंग ११

युएईने आपल्या घरच्या मैदानात दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान सारख्या संघाला पराभूत केलं. अशात टीम इंडियाने या संघाला कमी समजू नये. ग्रुप सामन्याच्या फेरीत एक पराभवही संघाला टुर्नामेंटमधून बाहेर काढू शकतो. हा सामना भारतासाठी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी आणि सुपर ४ साठी सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन शोधण्याची संधी असेल. या सामन्यात टीम इंडिया काही प्रयोग करू शकते.

INDIA vs UAE
Jasprit Bumrah : भारतीय संघाला मोठा धक्का? आशिया कपमधून जसप्रीत बुमराह बाहेर?

सॅमसन आणि जितेशमध्ये स्पर्धा

या सामन्यात भारतीय संघात काही बदल करण्याची शक्यता आहे. यष्टीरक्षकासाठी संजू सॅमसन आणि केरळ क्रिकेट लीगमध्ये धमाका करणारा जितेश शर्मामध्ये स्पर्धा आहे. जितेशनं प्लेइंग११ मध्ये आपलं स्थान पक्कं केलंय. दरम्यान ही स्पर्धा होऊन ३ महिने झाले आहेत. आता गौतम गंभीर आणि सूर्यकुमार यादव संजू सॅमसनला संधी देतात की जितेशला खेळण्यासाठी मैदानात उतरवतात, ते वेळच सांगेल.

भारतीय संघ अजून काही प्रयोग करणार आहे, यात शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा सलामीला येणार आहेत. कसोटी कर्णधार गिलच्या पुनरागमनानंतर संजू सॅमसनला सलामीची जागा गमवावी लागेल. त्याने मागील १० डावांमध्ये ३ शतकं केली आहेत. परंतु गिल संघाचे उपकर्णधार आहे, त्यामुळे तो हा सामना खेळेल हे निश्चित आहे. तर तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांना मधल्या फळीत फलंदाजीसाठी पाठवलं जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com