Sara Tendulkar: सचिनची लेक सारा तेंडुलकर पुन्हा चर्चेत; फोटोतील तो मराठी मुलगा कोण?

Sara Tendulkar Viral Photos with Mystery Friend: सारा तेंडुलकरने नव्या फोटोंमुळे चर्चांना उधाण आले आहे. सोशल मीडियावर साराचे एका मुलासोबतचे फोटो व्हायरल झालेत. फोटोमधील मुलगा नेमका कोण आहे? असा प्रश्न केला जात आहे.
Sara Tendulkar Viral Photos
Sara Tendulkar Viral Photos with Mystery Friendsaam tv
Published On
Summary
  • मुलाचं नाव सिद्धार्थ केरकर आहे.

  • सिद्धार्थ हा गोव्यातील राहणारा

  • दोघांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर चर्चांना उधाण

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लेक सारा पुन्हा एकदा चर्चेत आलीय. साराचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. यात सारा एका मुलासोबत दिसत आहे. फोटोतील मुलगा शुभमन गिल नसून कोणी दुसरा आहे. त्या दोघांचे फोटो गोवा आणि लंडनमधील आहेत. दरम्यान फोटोमधील हा मुलगा नेमका कोण? असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत.

अर्जुन तेंडुलकरच्या साखरपुड्याच्या बातम्यांमुळे तेंडुलकर कुटुंबीय चर्चेत आलं होतं. रवी घई यांची नात सानिया चंडोक हिच्याबरोबर अर्जुनचा साखरपुडा झालाय. यानंतर सारा तेंडुलकरने पिलाटे्स अकादमी सुरू केली. त्यामुळे पुन्हा सारा चर्चेत आली होती. आता एका मुलासोबतचे फोटो व्हायरल झाल्यानं सारा तेंडुलकर चर्चेत आलीय.

Sara Tendulkar Viral Photos
Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकर अन् जेमिमा यांच्यात आहे खास नातं; स्वत: पोस्ट शेअर करत केला खुलासा

दरम्यान या फोटोमध्ये असलेल्या मुलाचं नाव सिद्धार्थ केरकर आहे. सिद्धार्थ केरकर हा बिझनेसमॅन असल्याचं देखील म्हटलं जातंय. त्याच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये तो चित्रकार असल्याचं दिलं आहे. तो आपल्या पेंटिग्ससह त्याचे वेगवेगळ्या लुक्सचे अनेक फोटो देखील त्याने शेअर केलेत. सिद्धार्थ हा गोव्यातील राहणारा असून सोशल मीडियावर त्याचे ९० हजार पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

Sara Tendulkar Viral Photos
Sara Tendulkar: अर्जुननंतर सारा तेंडुलकरनं दिली खुशखबर; खास कार्यक्रमातले फोटो व्हायरल

सोशल मीडियावर सिद्धार्थ आणि साराचे अनेक फोटो आहेत. त्याच्या कुटंबासोबतही साराचे फोटो दिसत आहेत. एका फोटोमध्ये ते दोघे मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये असल्याचं दिसत आहेत. तर काही छायाचित्रांमध्ये साराचे कुटुंब सिद्धार्थसोबत गोव्यातील एका रेस्टॉरंटमध्ये दिसत आहे. ते छायाचित्र पाहून असेही दिसते की सिद्धार्थ हा त्या रेस्टॉरंटचा मालक आहे.

Sara Tendulkar Viral Photos
Rohit Sharma ODI Retirement: रोहित शर्माला वनडे क्रिकेटमधून रिटायर करण्याचा प्लान; माजी खेळाडूचा खळबळजनक दावा

दरम्यान सोशल मीडियावर दोघांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर दोघांचे प्रेमसंबंध आहेत, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. पण याबाबत अद्याप कोणताच उलगडा झाला नाहीये. याआधी सारा तेंडुलकरचे नाव शुभमन गिलसोबत जोडण्यात आले होते. दोघेही एकमेंकांच्या फोटोला कमेंट्स करत असत. त्यावरून दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याची चर्चा सुरू होत्या. त्याचदरम्यान आता साराच्या जीवनात नव्या मुलाची एंट्री झाल्यानं वेगळ्या चर्चांना पेव फुटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com