
सारा तेंडुलकरने अंधेरीत पिलेट्स अकादमी सुरू केली.
उद्घाटनाला सचिन तेंडुलकर, पत्नी आणि सानिया चांडोक उपस्थित होत्या.
पिलेट्समुळे स्नायूंना बळकटी आणि लवचिकता वाढते.
अर्जुन तेंडुलकर व सानिया चांडोक साखरपुड्याची चर्चा सुरू.
क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा झाला असल्याची माहिती आहे. अर्जुननंतर आता सारा तेंडुलकरनेही आनंदाची बातमी दिली आहे. सारानं मुबंईत पिलेट्स अकादमी सुरू केली आहे. या अकादमीचा नुकताच उद्घाटन समारंभ पार पडला. या उद्घाटन समारंभात सचिन तेंडुलकर, त्यांची पत्नी आणि सानिया चांडोक देखील उपस्थित होती. या समारंभातील फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
सारा तेंडुलकरनं मुंबईत स्वत:चा व्यवसाय सुरू केला आहे. तिनं मुंबईत पिलेट्स अकादमीची सुरूवात केलीये. याची पूर्वी दुबईमध्ये शाखा होती. मात्र, आता तिनं ही शाखा मुंबईतील अंधेरीत उघडली असून, या अकादमीचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला आहे. या उद्घाटन सोहळ्याला तेंडुलकर घरातील सदस्य तसेच अर्जुन देखील उपस्थित होता.
पिलेट्स म्हणजे काय?
पिलेट्स अकादमीमध्ये व्यायामाचे प्रशिक्षण दिले जाते. पिलेट्समुळे स्नायूंना बळकटी आणि शरीराची लवचिकता वाढते. जे शरीरासाठी फायदेशीर ठरते.
गुपचुप उरकला साखरपुडा?
सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचा साखरपुडा झाल्याची माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे. अर्जुन आणि सानिया चांडोक या दोघांचा साखरपुडा झाला असल्याची माहिती आहे. मात्र, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.