Accident: क्षणात भयंकर घडलं! दादरमध्ये सलमान खानच्या अंगावर झाड पडलं

Salman Khan Injured in Dadar Accident: दादर शिवाजी पार्कजवळ सकाळी टॅक्सीवर झाड कोसळले. चालक सलमान खान (३५) गंभीर जखमी झाला. अग्निशमन दलाने दरवाजा फोडून चालकाला वाचवले.
Salman Khan Injured in Dadar Accident
Salman Khan Injured in Dadar AccidentSaam Tv News
Published On
Summary
  • दादर शिवाजी पार्कजवळ सकाळी टॅक्सीवर झाड कोसळले.

  • चालक सलमान खान (३५) गंभीर जखमी झाला.

  • अग्निशमन दलाने दरवाजा फोडून चालकाला वाचवले.

  • टॅक्सीचे मोठे नुकसान झाले, चालकावर उपचार सुरू आहेत.

दादर येथील शिवाजी पार्कजवळ एक मोठी दुर्घटना घडली. एका टॅक्सीवर अचानक झाड कोसळलं. या भीषण दुर्घटनेत टॅक्सीचालक जखमी झाला असून, त्याच्यावर सध्या खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात घटल्यानंतर स्थानिकांनी परिसरात धाव घेत अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत वाहनचालकाचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला. या दुर्घटनेत टॅक्सीचेही मोठे नुकसान झाले आहे.

सलमान खान (वय वर्ष ३५) असे जखमी टॅक्सी चालकाचे नाव आहे. हा अपघात शिवाजी पार्क जवळील एल.जी मार्गावर घडला. बुधवारी सलमान आपली टॅक्सी घेऊन त्या परिसरात होता. मात्र, अचानक झाड उन्मळून टॅक्सीवर पडले. भलंमोठं झाड टॅक्सीवर पडल्याने टॅक्सी चालकाला गंभीर दुखापत झाली. तसेच टॅक्सीचाही चक्काचूर झाला.

Salman Khan Injured in Dadar Accident
BMC निवडणुकीसाठी जोरदार तयारी, महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; फडणवीस म्हणाले..

संबंधित घटना बुधवारी सकाळी १० च्या सुमारास घडली आहे. स्थानिकांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच सलमानला वाचवण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी अग्निशमन दलाला अपघाताची माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यासह मदतकार्याला सुरूवात केली.

अग्निशमन दलाच्या जवानांनी टॅक्सीतील सलमान वाहनचालकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याला तातडीने उपचारासाठी नजीकच्या खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या वाहनचालकावर उपचार सुरू असून, टॅक्सीचेही मोठे नुकसान झाले आहे.

Salman Khan Injured in Dadar Accident
वाल्मीक कराडच्या अटकेचा VIDEO गोट्या गीतेने केला शेअर, पुण्याहून पोलिसांचा पाठलाग करत...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com