BMC निवडणुकीसाठी जोरदार तयारी, महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; फडणवीस म्हणाले..

CM Devendra Fadnavis: बीएमसी निवडणुकीसाठी महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला निश्चित. जागावाटप हे पक्षाच्या ताकदीवर अवलंबून राहणार. - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
CM Devendra Fadnavis  File Pic
Devendra Fadnavissaam tv
Published On
Summary
  • बीएमसी निवडणुकीसाठी महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला निश्चित.

  • जागावाटप हे पक्षाच्या ताकदीवर अवलंबून राहणार.

  • मुंबईचे स्वतःचे वैशिष्ट्य जपण्याचा फडणवीसांचा निर्धार.

  • बीडीडी चाळ पुनर्वसनातून मराठी रहिवाशांना ५०० चौरस फूट फ्लॅट.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अवघे काही महिने शिल्लक आहेत. सर्वच पक्षांनी निवडणूक रणसंग्रामासाठी कंबर कसली आहे. बीएमसी निवडणुकीसाठी महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. जागावाटप हे प्रत्येक पक्षाच्या ताकदीवर अवलंबून असेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

बुधवारी एका वृत्तावाहिनीशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, '२०१७ सालच्या निवडणुकीत भाजपकडे ८२ नगरसेवक होते. तर, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतून भाजपचे १५ आमदार निवडून आले. जे इतर कोणत्याही पक्षाच्या तुलनेत सर्वाधिक आहेत. निवडणुका महायुती म्हणून लढवल्या जातील. मात्र, प्रत्येक पक्ष किती जागांवर लढणार हे त्यांच्या ताकदीवर ठरेल'.

CM Devendra Fadnavis  File Pic
मुंबईत मराठी - गुजराती वाद, परप्रांतियाकडून मराठी तरूणाला मारहाण; VIDEO व्हायरल

जिल्हा परिषद, नगरपंचायत आणि महानगरपालिकेसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबर ते डिसेंबर या महिन्यांमध्ये तीन टप्प्यांत होतील, असे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं.

मुंबईच्या विकासाबाबत फडणवीस म्हणाले, 'मुंबई ही मुंबईच राहावी. तिला शांघाय किंवा सिंगापूरसारखे करण्याची गरज नाही.

CM Devendra Fadnavis  File Pic
सोनं - चांदीच्या दरात वाढ की घट? २४ कॅरेटसाठी किती पैसे मोजावे लागणार?

मुंबईच्या विकासाबाबत फडणवीस म्हणाले, 'मुंबईचे एक स्वत:चे एक वैशिष्ट्य आहे. मला वाटते की ते वैशिष्ट्य शांघाय किंवा सिंगापूरपेक्षाही चांगले आहे'.

बीडीडी चाळींबाबत फडणवीस म्हणाले, 'काही मराठी माणसांनी मुंबई सोडली. तो दुरच्या भागात स्थायिक जरी झाला असला तरी, बीडीडी चाळीचं पुनर्वसन करत मराठी माणसाला घर देण्यात आलंय. त्यांना ५०० चौरस फूट फ्लॅट देण्यात आला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे', असंही फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com