सोनं - चांदीच्या दरात वाढ की घट? २४ कॅरेटसाठी किती पैसे मोजावे लागणार?

Gold Price Today: रक्षाबंधनानंतर सोन्याच्या दरात आज कोणताही बदल नाही. २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ₹१,०१,३५० वर स्थिर. चांदीच्या दरात प्रति ग्रॅम ₹११६ वाढ झाली.
Gold Price Today
Gold Price TodaySaam Tv News
Published On
Summary
  • रक्षाबंधनानंतर सोन्याच्या दरात आज कोणताही बदल नाही.

  • २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ₹१,०१,३५० वर स्थिर.

  • चांदीच्या दरात प्रति ग्रॅम ₹११६ वाढ झाली.

  • सोन्याचे दर आंतरराष्ट्रीय दर, कर, आणि मागणी-पुरवठ्यावर ठरतात.

गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या दरात चढउतार पाहायला मिळत आहे. रक्षाबंधन या सणानंतर सोन्याच्या दरात घसरण झाली होती. पण आज सोन्याचे दर जैसे थे आहे. ना वाढ ना घट, सोन्याच्या दरात कोणतेही बदल झालेले नाही. काल सोन्याच्या दरात घट झाली होती. प्रति तोळा सोन्याच्या दरात ५० रूपयांची घसरण झाली होती. मात्र, आज सोन्याच्या दरात कोणतेच बदल झालेले नाही. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

आज सोन्याचे दर जैसे थे आहे. २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्यासाठी ग्राहकांना १,०१,३५० रूपये मोजावे लागतील. तर, १०० ग्रॅम सोन्याचे दर १०,१३,५०० रूपये इतके आहे. २२ कॅरेट १० ग्रॅम सोनं खरेदीसाठी आपल्याला ९२,९०० रूपये मोजावे लागतील. तर, १०० ग्रॅम सोन्याचा दर ९,२९,००० इतके आहे.

Gold Price Today
निमंत्रण पत्रिकेत नाव, पण १ गोष्ट खटकली; आदित्य ठाकरे नाराज, BDDच्या कार्यक्रमात अनुपस्थित राहणार?

१८ कॅरेट सोन्याच्या दरातही कोणतेच बदल झाले नाही. १८ कॅरेट १० ग्रॅमसाठी आपल्याला ७६,०१० रूपये मोजावे लागतील. तर, १८ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याचे दर ७,६०,१०० इतके आहे. मात्र, चांदीच्या दरात वाढ झाली आहे. प्रति ग्रॅम चांदीच्या दरात ११६ रूपयांची वाढ झाली आहे. १ किलो चांदीचा दर १,१६,००० इतका आहे.

Gold Price Today
वाल्मीक कराडच्या अटकेचा VIDEO गोट्या गीतेने केला शेअर, पुण्याहून पोलिसांचा पाठलाग करत...

सोन्याची किंमत कशी ठरवली जाते?

सोन्याचे दर विविध आधारावर ठरवली जाते. आंतरराष्ट्रीय दर, आयात शुल्क अन् कर, डॉलरमधील विनिमय दर, मागणी -पुरवठा याचा समतोल, अशा विविध गोष्टींच्या आधारावर सोन्याचा दर निश्चित केला जातो. भारतात सोन्याचा वापर फक्त गुंतवणुकीसाठी नसून, सणवार, लग्नांमध्येही केला जातो. त्यामुळे सोन्याच्या दरातील थेट परिणाम खरेदीदारांच्या खिशावरही होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com