MI vs LSG saam tv
Sports

MI vs LSG: वानखेडे मैदानावर मुंबई विरूद्ध लखनऊ आमने-सामने; पाहा कशी असेल दोन्ही टीम्सची प्लेईंग ११

MI vs LSG Match Prediction: मुंबईच्या वानखेडे मैदानावर आज मुंबई इंडियन्स विरूद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यात सामना रंगणार आहे. दोन्ही टीम्ससाठी हा महत्त्वाचा सामना असणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

यंदाच्या आयपीएलमध्ये ४५ वा सामना २७ एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरूद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यामध्ये रंगणार आहे. दुपारी मुंबईच्या वानखेडे मैदानावर हा सामना रंगणार आहे. या सामन्यात कोणती टीम बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

यंदाच्या सिझनमध्ये मुंबईच्या टीमची सुरुवात काही फारशी चांगली झाली नाही. मात्र त्यानंतर मुंबईने त्यांच्या खेळ दाखवत सलग ४ सामने जिंकले. त्यामुळे मुंबईची टीम पुन्हा एकदा प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी दावेदार मानली जातेय. दुसरीकडे लखनऊ सुपर जाएंट्सने आतापर्यंत ९ सामन्यांपैकी ५ विजय मिळवला आहे.

कसं आहे वानखेडेचं पीच?

मुंबई विरूद्ध लखनऊ यांच्यामध्ये वानखेडे मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे. या मैदानावरील खेळपट्टी फलंदाजांच्या दृष्टीने अनुकूल मानली जातेय. त्यामुळे जी टीम टॉस जिंकेल ती टीम गोलंदाजी घेऊन लक्ष्याचा पाठलाग करण्यावर भर देईल.

या पीचवर नव्या बॉलमुळे सुरुवातीच्या वेळेस थोडी मदत मिळणार आहे. मात्र त्यानंतर फलंदाजांना खेळणं थोडं कठीण होऊ शकतं. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या टीमला कमीत कमी २०० पेक्षा जास्त रन्स करावे लागणार आहे.

कशी असेल दोन्ही टीम्सची प्लेईंग ११

मुंबई इंडियन्स

रायन रिकेल्टन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, विल जॅक्स, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, विघ्नेश पुथूस

लखनऊ सुपर जाएंट्स

एडन मार्कराम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, दिग्वेश सिंग राठी, रवी बिश्नोई, आवेश खान, प्रिन्स यादव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मंत्र्यांची मालामाल खाती, निवडणुकीसाठी? कोण जिरवणार मंत्र्यांची मस्ती?

Maharashtra Live News Update: मनमाड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० ची निवडणूक स्थगित

Thursday Horoscope: ५ राशींचा पाण्यासारखा पैसा होणार खर्च, काहींचे होतील वाद, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Ayushman Bharat: ५ लाख नाही तर १० लाखांपर्यंत मोफत उपचार; कोणत्या कुटुंबांना होणार फायदा? वाचा सविस्तर माहिती

पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, मेट्रोचं जाळं विस्तारणार; 31 किमी लांबीच्या २ मार्गिका अन् २८ स्थानके

SCROLL FOR NEXT