Virat Kohli: विराट आणि अनुष्का लंडनला का राहायला गेले? समोर आलं मोठं कारण

Virat Kohli: गेल्या काही काळापूर्वी टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा लंडना वास्तव्यास गेले आहेत. मात्र हे खेळाडू का लंडनला गेले हा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे.
Virat Kohli
Virat Kohlisaam tv
Published On

टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा त्यांच्या दोन्ही मुलांसह लंडनला रहायला गेले आहेत. चाहत्यांना मनात अजूनही प्रश्न आहे की विराट आणि अनुष्का यांनी भारत देश का सोडला? दरम्यान हे दोघंही लंडनला का शिफ्ट झाले याचं कारण आता समोर आलं आहे.

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दिक्षीतचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी नुकतीच एक पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याने विराट आणि अनुष्का लंडनमध्ये का रहायला गेले याबाबत मोठा खुलासा केला आहे.

Virat Kohli
Rohit Sharma: तू माझ्यासारखा नाही खेळू शकत...! 23 वर्षीय खेळाडूला असं का म्हणाला रोहित शर्मा? पाहा Video

लंडनमध्ये का शिफ्ट झाले विरूष्का?

कंटेट क्रिएटर रणवीर अल्लाहबादियाच्या युट्युबवर बोलताना डॉ. नेने यांनी सांगितलं की, विराट आणि अनुष्का भारतीय लोकांच्या देखरेखीपासून वाचण्यासाठी लंडनला शिफ्ट झाले आहेत. भारतात राहिल्यानंतर मिडिया आणि लोकांच्या सततच्या नजरेमुळे त्यांना यशाचा आनंद घेणं कठीण झालं होतं.

डॉ. नेने यांनी पुढे सांगितलं की, मी स्वतः विराटचा खूप सन्मान करतो. मी त्याला अनेकदा भेटलो असून तो एक चांगला व्यक्ती आहे. मी अनुष्काशीही बोललो आहे. हे कपल लंडनला जाण्याचा विचार करत होतं कारण त्याला भारतात यशाचा किंवा इतर गोष्टींचा आनंद घेता येत नव्हता. ते जे काही करत होते ते लक्ष वेधून घेण्यासारखं होतं म्हणून त्यांना हा निर्णय घेतला. म्हणून आम्ही त्याच्या निर्णयाचे कौतुक करतो.

Virat Kohli
IPL 2025 : पावसामुळे KKR आणि PBKS सामना रद्द; पॉईंटस् टेबलमध्ये मोठा बदल, मुंबईला मोठा फटका

लंडनला सामान्य जीवन जगतात

विराट आणि अनुष्का परदेशात त्यांची सिंपल लाईफ जगतात. भारतात प्रोफेशनल जबाबदाऱ्या पार पाडत असून हे कपल त्यांच्या कुटुंबासाठी एक प्रायव्हेट जीवन जगतायत, असंही डॉ. नेने यांनी सांगितलंय.

Virat Kohli
IPL 2025 KKR vs PBKS: प्रभसिमरन आणि प्रियांशने शानदार खेळी; केकेआरला २०२ धावांचे लक्ष्य

सध्या विराट कोहली चांगल्या फॉर्ममध्ये आहे. सध्या आयपीएल सुरु असून आयपीएलच्या ९ सामन्यांमध्ये 65.33 च्या सरासरीने त्याने ३९२ रन्स केले आहेत. शिवाय त्याने आतापर्यंत ५ अर्धशतकंही ठोकली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com