Rohit Sharma: तू माझ्यासारखा नाही खेळू शकत...! 23 वर्षीय खेळाडूला असं का म्हणाला रोहित शर्मा? पाहा Video

Rohit Sharma's lesson to Abdul Samad: आज मुंबईच्या वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्स विरूद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
Rohit Sharma's lesson to Abdul Samad
Rohit Sharma's lesson to Abdul Samadsaam tv
Published On

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आज दुपारी मुंबई इंडियन्स विरूद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. यंदाच्या सिझनमध्ये यापूर्वी झालेल्या सामन्यात लखनऊने मुंबईचा पराभव केला होता. त्यामुळे यावेळी मुंबई घरच्या मैदानावर पराभवाचा बदला घेणार का हा प्रश्न सर्वांसमोर आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी रोहित शर्माचा एका युवा खेळाडूसोबतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

सामन्यापूर्वी प्रॅक्टिस करत असताना मुंबई इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा आणि लखनऊचा खेळाडू अब्दुल समद यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये रोहित शर्मा २३ वर्षीय युवा खेळाडूला काही टीप्स देताना दिसतोय.

Rohit Sharma's lesson to Abdul Samad
IPL 2025 : पावसामुळे KKR आणि PBKS सामना रद्द; पॉईंटस् टेबलमध्ये मोठा बदल, मुंबईला मोठा फटका

रोहितने दिल्या तरूण खेळाडूला खास टीप्स

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ वानखेडे स्टेडियमचा आहे. या ठिकाणी सामन्यापूर्वी दोन्ही टीम्स वानखेडे स्टेडियममध्ये प्रॅक्टिस करत होत्या. प्रॅक्टिस दरम्यान रोहितने जम्मू-काश्मिरच्या २३ वर्षीय खेळाडूला टीप्स दिले. यावेळी रोहितने खेळाडूला मानसिकरित्या तयार राहण्याचा सल्ला दिला. हा व्हिडीओ लखनऊ सुपर जाएंट्सच्या सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे.

काय म्हणाला रोहित?

लखनऊ सुपर जाएंट्सद्वारे शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये रोहित शर्मा म्हणतोय की, कधी-कधी कसं असतं की विकेटचा एक पेस असतो. हा प्रत्येक दिवशी वेगळा असतो. आज ह्यूमिडीटी जास्त असेल तर उद्या मॉइश्चर जास्त असू शकतं. ह्यूमिडीटी कमी असेल तर हवा जास्त असते आणि खेळपट्टी चांगली राहतो. हे जोपर्यंत सामना सुरु होत नाही तोपर्यंत समजत नाही.

Rohit Sharma's lesson to Abdul Samad
IPL 2025 KKR vs PBKS: प्रभसिमरन आणि प्रियांशने शानदार खेळी; केकेआरला २०२ धावांचे लक्ष्य

रोहितने समदला टेक्निक देखील समजावून सांगितली. रोहित म्हणाला की, तू माझ्यासारखा नाही खेळू शकत किंवा मी तु्झ्यासारखा नाही खेळू शकत. तुझं एक वेगळं टॅलेंट आहे. मी त्याची टेक्निक पाहेन, असं केलं तर संपूर्ण आयुष्य निघून जाईल. त्यामुळे याठिकाणी सर्वात महत्त्वाचं आहे ते आपलं डोकं, आपण बुद्धीने कसं खेळू शकतो हे महत्त्वाचं आहे.

Rohit Sharma's lesson to Abdul Samad
आम्हीही ३०० करु शकतो, IPL गाजवणाऱ्या प्रसिद्ध खेळाडूचा दावा, नेमकं कुणी म्हटलं?

मुंबई आणि लखनऊच्या टीमने या सिझनमध्ये आतापर्यंत ९-९ सामने खेळले आहेत. यामध्ये दोन्ही टीम्सने आतापर्यंत ५-५ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. त्यामुळे दोन्ही टीम्सच्या खात्यात १० पॉईंट्स आहेत. अशातच आजचा सामना कोण जिंकणार हे महत्त्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com