Yashasvi Jaiswal saam tv
Sports

Ranji Trophy : मुंबईच्या जयस्वालची यशस्वी खेळी; झळकविले तिसरे शतक

आज यशस्वी जयस्वालने दिमाखदार खेळ केला.

Siddharth Latkar

मुंबई (Mumbai vs Uttar Pradesh, 2nd Semi-Final) : रणजी करंडक (ranji trophy) क्रिकेट (cricket) स्पर्धेत मुंबईच्या (mumbai) यशस्वी जयस्वालने (yashasvi jaiswal) याने आज उत्तरप्रदेश विरुद्ध खेळताना शतक ठाेकले. त्याने हा टप्पा 240 चेंडूत पार केला. खरंतर जयस्वालने 54 व्या चेंडूत पहिली धाव काढली हाेती. त्यानंतर त्याने कधी संयमाने तर कधी आक्रमक खेळ करीत तिसरे शतक झळकाविले. जयस्वालच्या या कामगिरीमुळे त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव हाेऊ लागला आहे. (Yashasvi Jaiswal Latest Marathi News)

जयस्वालने रणजी ट्रॉफीच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत उत्तर प्रदेशविरुद्धच्या दोन्ही डावांत शतक झळकावले. त्याने पहिल्या डावात शंभर धावा केल्या हाेत्या. डावखुऱ्या फलंदाज असलेल्या जयस्वालने रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत उत्तराखंडविरुद्धही १०३ धावा केल्या होत्या.

गेल्या चार डावांतील जयस्वालचे हे तिसरे शतक आहे. दुसऱ्या बाजूला अरमान जाफरने (Armaan Jaffer) शतक ठाेकले. या दोन्ही खेळाडूंमध्ये आतापर्यंत दाेनशे हून अधिक धावांची भागीदारी झाली आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी मुंबईची आघाडी 500 धावांच्या पुढे गेली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा

Sara Ali Khan: पतौडीच्या राजकुमारीचे क्यूट बार्बी डॉल लूक पाहिलेत का?

Mental Health: तुमची मानसिक स्थिती बदलत आहे का? 'या' ५ लक्षणांवर लक्ष ठेवा

Ladki Bahin Yojana : 'पोर्टल बंद, नव्या नोंदणी होणार नाहीत'; उद्धव ठाकरेंनी लाडक्या बहिणींचं भविष्यच सांगितलं

Sleep Internship: पुण्याच्या तरुणीने दररोज ९ तास झोप काढून कमावले ९ लाख रुपये; नेमकी नोकरी आहे तरी कोणती?

SCROLL FOR NEXT