नवी दिल्ली : खेलो इंडिया युथ गेम्समध्ये (Khelo India Youth Games) सहभागी होणाऱ्या २१८९ खेळाडूंसाठी भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (Sports Authority of India) ६.५२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. एप्रिल ते जून या कालावधीत हे पैसे खेळाडूंना (players) पॉकेटमनी म्हणून दिले जाणार आहेत. यानूसार साईने एका खेळाडूच्या पॉकेटमनीसाठी 29 हजार 785 रुपये खर्च करण्याचे निश्चित केले आहे. विविध 21 श्रेणीनूसार पॅरा एथलिटसह खेळाडूंना हे पैसे दिले जाणार आहेत. (khelo india youth games latest marathi news)
वार्षिक खेलो इंडिया शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत मान्यताप्राप्त प्रशिक्षण केंद्रात सराव करणाऱ्या प्रत्येक खेळाडूस 6.28 लाखांचे आर्थिक सहाय करण्यात आले आहे. त्यामध्ये 1.20 लाखांच्या पाॅकेटमनीचा समावेश असल्याचे साईने (sports) नमूद केले आहे.
पाॅकेटमनी म्हणून दिले जाणारे वार्षिक 1.20 लाख रुपये हे थेट खेळाडूंच्या बँक खात्यात जमा केले जातील. त्याचबरोबर उर्वरित रक्कम खेळाडूंच्या प्रशिक्षण, भोजन, शिक्षणासह राहणीमानावर खर्च करण्यात येणार आहे. खेळाडूला खेलो इंडिया अकादमीत (Khelo India Academy) राहावे लागेल, जिथे त्याला खेळाचे (games) प्रशिक्षण दिले जाईल असे साईने स्पष्ट केले आहे.
घरी जाण्यासाठी भत्ता
साईने देऊ केलेल्या खर्चामध्ये खेळाडूंना त्यांच्या घरी जाण्यासाठीचे प्रवास भाडे देखील समाविष्ट केले आहे. याशिवाय खेळाडूच्या जेवणाचा आणि इतर खर्चही साई खेळाडू घरी असे पर्यंत करेल. खेलो इंडिया टॅलेंट डेव्हलपमेंट स्कीम अंतर्गत (Khelo India Talent Development Scheme) या निधीची तरतूद केल्याचे साईने नमूद केले.
पंचकुला (हरियाणा) येथे झालेल्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये देशातील 36 हून अधिक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील सुमारे 4,700 खेळाडूंनी भाग घेतला. ज्यात 2,262 महिला खेळाडूंचा समावेश हाेता. या खेळाडूंनी 25 वेगवेगळ्या खेळांत स्वतःचे काैशल्य सिद्ध केले.
विविध 25 खेळांमध्ये एकूण 903 पदके खेळाडूंनी पटकावली. मल्लखांब, गटका, कलरीपयट्टू, थांग-ता आणि योगासन या पाच खेळांचा यंदा प्रथमच खेला इंडिया स्पर्धेत समाविष्ट करण्यात आला हाेता. यंदाच्या स्पर्धेत 33 राज्यांनी किमान एक पदक जिंकले, त्यात 28 सुवर्णपदकाचा समावेश आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.