खेलो इंडियात सुदेष्णा शिवणकरची सुवर्ण कामगिरी; मैदानी स्पर्धेत महाराष्ट्रास १२ पदके

खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी कुस्ती, ॲथलेटिक्स, मल्लखांब, जलतरण, वेटलिफ्टिंगमध्ये पदक प्राप्त केली आहेत.
khelo india youth games, sudeshna shivankar, avantika narale, maharashtra, gold medal, athletics
khelo india youth games, sudeshna shivankar, avantika narale, maharashtra, gold medal, athleticssaam tv
Published On

पंचकुला : खेलो इंडिया (khelo india youth games) स्पर्धेत महाराष्ट्राच्या (maharashtra) खेळाडूंनी अ‍ॅथलेटिक्सचे मैदान गाजवले. ४ बाय ४०० मीटर रिलेत मुलींनी सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेत २०० मीटर धावण्यात सातारा (satara) येथील सुदेष्णा शिवणकरने (sudeshna shivankar) आज (गुरुवार) पुन्हा सुवर्णपदकास (gold medal) गवसणी घातली. याबराेबरच साता-यातील अवंतिका नरळे (avantika narale) हिने रौप्यपदक मिळविले. (maharashtra athletes bagged gold in khelo india youth games)

मुलांमध्ये आर्यन कदम (पुणे) याने २०० मीटरमध्ये सुवर्ण पदक मिळविले. मुलांचा रिले संघ अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. हरियानाच्या संघाने विजेतेपदाचा करंडक पटकाविला. या स्पर्धेत मध्य प्रदेश आणि तामीळनाडूस अनुक्रमे उपविजेतेपद मिळाले.

Sudeshna Shivankar
Sudeshna Shivankarsaam tv

मुलींच्या रिलेत महाराष्ट्रने बाजी मारली. या संघात रिया पाटील (कोल्हापूर), वैष्णवी कातुरे (नाशिक), प्रांजली पाटील (मुंबई), शिवेच्छा पाटील (पुणे) यांचा समावेश होता. मुलांप्रमाणे मुलींमध्ये हरियानाच्या संघास फारशी चमक दाखवता आली नाही. या स्पर्धेत तामीळनाडू आणि कर्नाटक संघास उपविजेतेपद मिळाले.

maharashtra athletes bagged gold in khelo india youth games
maharashtra athletes bagged gold in khelo india youth gamessaam tv

मुलींच्या रिलेच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी केली. ४ बाय ४०० मीटरमध्ये ४. ०२. ७६ सेकंदाची वेळ नोंदवून सुवर्णपदक पटकावून महाराष्ट्राचा झेंडा हरियानात फडकविला. महाराष्ट्राने ८ सुवर्ण, ३ रौप्य आणि एका कास्य पदकाची कमाई केली. सुदेष्णा शिवणकर आणि अवंतिक नरळे यांनी वैयक्तिक तीन-तीन पदके पटकावली. सुदेष्णाने १०० मीटर धावण्यात नोंदवलेली (११.७९ सेकंद) वेळ तिची आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली आहे. तिने २०० मीटरमध्ये २४.२९ सेकंदाची वेळ नोंदवली.

maharashtra athletes in khelo india youth games.
maharashtra athletes in khelo india youth games.saam tvn

४ बाय १०० मीटर रिलेमध्येही मुलींच्या संघाने सुवर्णपदक घेतले आहे. त्यात साक्षी चव्हाण (औरंगाबाद), सुदेष्णा शिवणकर (सातारा), अवंतिका नरळे (पुणे), सिया सावंत (मुंबई) या खेळाडूंचा समावेश हाेता.

khelo india youth games, sudeshna shivankar, avantika narale, maharashtra, gold medal, athletics
सरकारचा माेठा निर्णय; रात्री दहा नंतर लग्न समारंभास बंदी; साडे आठला बाजारपेठ राहणार बंद?
khelo india youth games, sudeshna shivankar, avantika narale, maharashtra, gold medal, athletics
पहिली ते सातवीला आता सातऐवजी एकच पुस्तक
khelo india youth games, sudeshna shivankar, avantika narale, maharashtra, gold medal, athletics
पुणेकरांनाे सावधान! 34 शाळांवर मान्यता रद्दची टांगती तलवार; जाणून घ्या यादी

जिद्दी साक्षी चव्हाणने पटाकाविले पदक

मुलींच्या १०० मीटर रिले संघात सहभागी झालेली औरंगाबादची साक्षी चव्हाण काही महिन्यांपूर्वी दुखापतग्रस्त होती. तिच्या गुडघ्याला मोठी दुखापत होती. त्यातून ती नुकतीच सावरली आहे. गेल्या वर्षी तिला स्पर्धा खेळता आली नव्हती. खेलो इंडियात सहभागी होण्यापूर्वी ती गुजरातमध्ये स्पर्धा खेळली. मात्र, त्या स्पर्धेत तिला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. खेलो इंडियात ती रिलेच्या संघात दुसऱ्या लेगला धावली. महाराष्ट्राने घेतलेली आघाडीने तिने कायम ठेवली. दुखापतीतून सावरून पदक उंचावल्याचा आनंद खूप मोठा असल्याची भावना साक्षीने व्यक्त केली.

Edited By : Siddharth Latkar

khelo india youth games, sudeshna shivankar, avantika narale, maharashtra, gold medal, athletics
Asia Cup Archery: आशिया करंडक तिरंदाजीत भारताचा दबदबा; साता-याचा पार्थ चमकला

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com