
सातारा : गाळपास येणाऱ्या ऊसाला (sugarcane) १० दिवसांत पेमेंट देणारा कारखाना असा नावलौकिक मिळवलेल्या सातारा (satara) जिल्ह्यातील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याने (ajinkyatara sahakari sakhar karkhana) या हंगामात गाळपास आलेल्या उसाला प्रति टन २६०० रुपये उचल १० दिवसात दिली होती. दरम्यान कारखान्याने गाळपास आलेल्या ऊसाला २०० रुपये प्रतिटन याप्रमाणे दुसरा हप्ताही (sugarcane bill) ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या (farmers) बँक खात्यात नुकताच वर्ग केला आहे अशी माहिती कारखाना प्रशासनाने दिली. (shivendrasinhraje bhosale latest marathi news)
अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचा यंदाचा गळीत हंगाम नुकताच यशस्वीपणे पार पडला. अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या इतिहासातील विक्रमी गाळप आणि साखर उत्पादनाची नोंद या हंगामात झाली आहे.
या गळीत हंगामात ८७०४८२.३६३ मेट्रीक टन उसाचे गाळप करून कारखान्याने १२.६२ टक्के साखर उताऱ्याने १०,३०,०९० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. गाळपास आलेल्या उसाला १० दिवसांच्या आत प्रतिटन २६०० रुपये याप्रमाणे पहिला हप्ता कारखान्याने शेतकऱ्यांना अदा केला होता.
आता प्रतिटन २०० रुपये याप्रमाणे एकूण १७ कोटी ४० लाख ९६ हजार ४७१ रुपये कारखान्याने ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केले आहेत. शेतकऱ्यांनी संबंधित बँक शाखेत संपर्क साधावा असे आवाहन कारखाना प्रशासनाने केले आहे. दुसऱ्या हप्त्याचे पेमेंटही वेळेत आदा केल्यामुळे ऊस पुरवठादार शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.