IPL 2025 Points Table saam Tv
Sports

IPL 2025 Points Table: मुंबईच्या एका विजयानं मोठी उलटफेर; Points Tableमध्ये चार अंकांची भरारी

IPL 2025 Points Table: वानखेडे स्टेडियमवर एकतर्फी सामना झाला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने केकेआरचा ८ गडी राखून पराभव केला.

Bharat Jadhav

आयपीएल २०२५ च्या १२व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा ८ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना कोलकाताचा संपूर्ण संघ केवळ ११६ धावांवरच गडगडला. अश्वनी कुमारने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात कहर केला. त्याने चार विकेट घेतल्या. मु्ंबईने हे लक्ष्य १२.५ षटकांत केवळ २ गडी गमावत पूर्ण केलं.

मुंबईकडून फलंदाजी करताना रायन रिकेल्टनने शानदार फलंदाजी करत ४१ चेंडूत ६२ धावांची नाबाद खेळी केली. या विजयाचा मुंबईला पॉइंट टेबलमध्ये मोठा फायदा झाला. तर पॉइंट टेबलमध्ये पराभवामुळे केकेआरचं मोठे नुकसान झालं. दरम्यान आजच्या सामन्यात टॉस जिंकून कर्णधार हार्दिक पंड्याने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय मुंबईसाठी फायदेशीर ठरला.

असं आहे पॉइंट टेबल

मुंबई इंडियन्सने वानखेडेवर आयपीएल २०२५ मध्ये आपले विजयाचे खाते उघडलं. आपल्या पहिल्या विजयामुळे मुंबईचा संघ पॉइंट टेबलमध्ये १०व्या स्थानावरून सहाव्या स्थानावर पोहोचलाय. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अव्वल स्थान कायम राखलंय. तर दुसऱ्या क्रमांकावर दिल्ली कॅपिटल्स आणि तिस-या क्रमांकावर लखनौ सुपर जायंट्सचा संघ आहे.

या पराभवामुळे कोलकाता नाईट रायडर्सचे मोठे नुकसान झालंय. तिसऱ्या सामन्यात दुसऱ्या पराभवासह केकेआर गुणतालिकेत तळाच्या स्थानावर पोहोचलाय. तर राजस्थान रॉयल्स नवव्या क्रमांकावर आहे. आणि सनरायझर्स हैदराबाद आठव्या स्थानावर आहे.

मुंबई इंडियन्सच्या विजयात अश्वनी कुमार आणि रयान रिकेल्टनने महत्त्वाची भूमिका बजावली. अश्वनीने दमदार गोलंदाज करताना ३ षटकात २४ धावा देत ४ विकेट घेतल्या. अश्वनीने आपल्या पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेला बाद केलं. त्यानंतर रिंकू सिंह, आंद्रे रसेल, मनीष पांडे, यांनाही तंबूत पाठवलं. मुंबईकडून फलंदाजी करताना रयान रिकेल्टनने फटकेबाजी करत ४१ चेंडूत ६२ धावांची नाबाद खेळी केली. यात ४ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT