MI vs KKR: बोल्टने केला बोल्ड! यॉकर टाकत सुनील नरेनचा उडवला त्रिफळा; वानखेडेवर बोल्टचा कहर Video Viral

MI vs KKR Boult Wicket : आयपीएल 2025 च्या महत्त्वाच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स मुंबई इंडियन्सशी भिडत आहेत. KKR ची सुरुवात खराब झाली आणि पॉवरप्लेमध्ये टीमने चार विकेट गमावल्या.
MI vs KKR
MI vs KKR Boult Wicketsaam tv
Published On

मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्समध्ये सामना होतोय. वानखेडे स्टेडियमवर या दोन्ही संघाचा लढत होतेय. या सामन्यात मुंबई इंडियन्सचं वर्चस्व दिसत आहे. वानखेडेच्या स्टेडियमवर ट्रेंट बोल्टच्या लहरी चेंडूंनी कहर केला. प्रत्येक वेळी संघाला मोठ्या धावसंख्या उभारण्याचा पाया रचायचा त्या खेळाडूला बोल्टने बोल्ड करत कोलकाताला पहिला धक्का दिला.

नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या केकेआरची सुरुवात चांगली राहिली नाही. पॉवरप्लेमध्येच संघाने आपल्या चार मोठ्या विकेट गमावल्या. कर्णधार अजिंक्य रहाणे देखील खेळपट्टीवर जास्तवेळ तग धरू शकला नाही.

MI vs KKR
CSK हारली तरी झालं मुंबई इंडियन्सचं नुकसान; बिघडलं मुंबईचं सारं गणित

पहिल्याच षटकात बोल्टचा कहर दिसला

डावाच्या चौथ्या चेंडूवर ट्रेंट बोल्टने सुनील नरेनला खाते न उघडता पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. नरेन बोल्टच्या चेंडूवर जोरात फटका मारण्याचा प्रयत्न करत होता. परंतु बोल्टने टाकलेला यॉकरने नरेनचा त्रिफळा उडवला. नरेन अवघ्या २ चेंडूंचा सामना करून शून्यावर बाद झाला. आयपीएलच्या इतिहासात पहिल्याच षटकात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम बोल्टच्या नावावर आहे.

बोल्टने इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्याच षटकात आतापर्यंत एकूण ३० विकेट्स घेतल्या आहेत. बोल्टनंतर या यादीत भुवनेश्वर कुमारचे नाव आहे. त्याने २७ विकेट घेतल्या आहेत. बोल्टला मुंबई संघाने 12.50 कोटी रुपये खर्च घेतलं आहे.

दरम्यान मुंबई इंडियन्स कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. कर्णधार हार्दिकचा निर्णय योग्य ठरवत मुंबईच्या गोलंदाजांनी केकेआरच्या फलंदाजांना अवघ्या ११६ धावांवर रोखलं. कोलकताची सुरुवात चांगली राहिली नाही. बोल्टने सुनील नरेनला पहिल्याच षटकात बाद केलं. त्यानंतर दुसऱ्याच षटकात दीपक चहरने क्विंटन डी कॉकला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. कर्णधार अजिंक्य रहाणेनेही आपल्या कामगिरीने निराश केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com