MI vs RCB Head to head, Playing 11
MI vs RCB Head to head, Playing 11 MI/Twitter
क्रीडा | IPL

MI vs RCB Head to Head: आरसीबीविरुद्धच्या सामन्याआधी मुंबई इंडियन्ससाठी गुड न्यूज; चाहत्यांचा आनंद गगनात मावेना

Satish Daud-Patil

MI vs RCB Playing 11: इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलच्या १६ व्या हंगामात आज रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सचा सामना फाफ डू प्लेसिसच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासोबत होणार आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर सायंकाळी ७ वाजता या सामन्याला सुरूवात होईल.

प्ले ऑफच्या दृष्टीने दोन्ही संघासाठी आजचा सामना महत्वाचा असणार आहे. दरम्यान, सामना सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.  (Latest sports updates)

यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सने आतापर्यंत १० सामने खेळले असून यातील ५ सामन्यात विजय तर ५ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. १० गुणांसह मुंबईचा संघ ८ व्या स्थानावर आहे. दुसरीकडे आरसीबीची स्थिती सुद्धा अशीच काही आहे.

त्यांनी सुद्धा १० सामने खेळले असून ५ सामन्यात विजय तर ५ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. मात्र, मुंबईपेक्षा नेटरनरेट अधिकच चांगले असल्याने ते ६ व्या क्रमांकावर आहे.

मुंबई विरुद्ध आरसीबी हेड-टू-हेड रेकॉर्ड

 आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत दोन्ही संघ तब्बल ३१ वेळा आमने-सामने आले आहेत. यातील १७ सामन्यात मुंबईने विजय मिळवला असून १४ सामन्यात आरसीबीने त्यांचा पराभव केला आहे.

विशेष बाब म्हणजे आरसीबीने गेल्या ६ सामन्यात ५ वेळा मुंबईचा पराभव केला आहे. मात्र, असं असलं तरी आरसीबीविरुद्ध घरच्या मैदानावर खेळताना मुंबईने मागील ९ सामन्यात ६ वेळा विजयाला गवसणी घातली आहे.

वानखेडेवर मुंबईचा रेकॉर्ड जबरदस्त

आरसीबीविरोधात मुंबईचा रेकॉर्ड घरच्या मैदानावर खूपच खास आहे. त्यामुळे आजचा सामना सुद्धा वानखेडे मैदानावर होत असल्याने या सामन्यातही मुंबई इंडियन्स संघाचेच पारडे जड मानले जात आहे.

दुसरीकडे फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वात खेळणारा आरसीबीचा संघाला सुद्धा कमी लेखून चालणार नाही. कारण, कर्णधार डू प्लेसिससोबत विराट कोहली सुद्धा चांगला फॉर्ममध्ये आला आहे. कोहलीने मागच्या सामन्यात दमदार अर्धशतक झळकावलं होतं. आजच्या सामन्यातही तो चांगला फॉर्म दाखवले अशी, आरसीबीच्या चाहत्यांना आशा असेल.

अशी असू शकते दोन्ही संघाची प्लेईंग-११

मुंबई इंडियस: रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), कैमरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, ट्रिस्टन स्टब्स, टीम डेविड, नेहल वढेरा, पीयूष चावला, ऋतिक शौकीन, ख्रिस जॉर्डन, अरशद खान

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: फाफ डुप्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मैक्सवेल, केदार जाधव, शाहबाज अहमद, वानिंदु हसारंगा, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, जोश हेजलवुड

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hording Collapse : पुणे-सातारा महामार्गाजवळ होर्डिंग कोसळलं; परिसरात आणखी छोटे-मोठे होर्डिंग, नागरिकांनी व्यक्ती केली भीती

Nushrratt Bharuccha Birthday : 'चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर नैराश्य, पूर्ण पेमेंटही...'; 'आकाशवाणी'नंतर नुसरत भरुचाच्या आयुष्यात नेमकं काय घडलं?

Remedies For Cockroaches : घरात बारक्या झुरळांचा सुळसुळाट झालाय? अस्सल रामबाण उपाय, वर्षभर झुरळ दिसणार नाही

Special Report : Ajit Pawar | दादांची गैरहजेरी, काकांची कुरघोडी

Special Report : Onion News | मोदींच्या सभेत कांद्यावरून गोंधळ, भाषणात तरुणाची घोषणाबाजी

SCROLL FOR NEXT