mumbai indians vs chennai super kings ipl 2024 mumbai indians need 207 runs to win  twitter
Sports

MI vs CSK, IPL 2024: मुंबईत मराठमोळ्या खेळाडूंचा जलवा! ऋतुराज- दुबेची अर्धशतकं; पलटणला जिंकण्यासाठी 207 धावांचं आव्हान

Mumbai Indians vs Chennai Super Kings 1st Inning: आयपीएल स्पर्धेतील २९ वा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकला असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे

Ankush Dhavre

आयपीएल स्पर्धेतील २९ वा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकला असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने २० षटकअखेर २०६ धावा केल्या आहेत. तर मुंबई इंडियन्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी २०७ धावांची गरज आहे.

या सामन्यात हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकला आणि चेन्नई सुपर किंग्ज संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून डावाची सुरुवात करण्यासाठी लोकल बॉय अजिंक्य रहाणे आणि रचिन रविंद्रची जोडी मैदानावर आली होती. रहाणेला ओपनिंगला पाठवण्याचा सीएसेकचा डाव फसला.

कारण तो अवघ्या ५ धावा करत माघारी परतला. चेन्नईला अवघ्या ८ धावांवर पहिला धक्का बसला. त्यानंतर रचिन रविंद्र २१ धावा करत माघारी परतला. कर्णधार ऋतुराज गायकवाडने या डावात ४० चेंडूंचा सामना करत ५ चौकार आणि ५ षटकारांच्या साहाय्याने ६९ धावांची खेळी केली. कर्णधार हार्दिक पंड्याने त्याला बाद करत माघारी धाडलं. तर शिवम दुबेने ३८ चेंडूंचा सामना करत ६६ धावांची खेळी करत संघाची धावसंख्या २०६ पर्यंत पोहचवली.

मुंबई इंडियन्स संघाकडून गोलंदाजी करताना हार्दिक पंड्याने ३ षटक गोलंदाजी केली आणि ४३ धावा खर्च करत २ गडी बाद केले. तर गेराल्ड कोएत्जीने १ आणि श्रेयस गोपालने १ गडी बाद केले.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११..

मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा, ईशान किशन(यष्टीरक्षक), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), श्रेयस गोपाल, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह, आकाश मधवाल, टिम डेव्हिड, मोहम्मद नबी, रोमॅरियो शेफर्ड.

इम्पॅक्ट प्लेअर्स – सूर्यकुमार यादव, डेवाल्ड ब्रेविस, नमन धीर, नेहाल वढेरा, हार्विक देसाई

चेन्नई सुपर किंग्ज – रचिन रवींद्र, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान

इम्पॅक्ट प्लेअर्स – मथिशा पाथीराना, निशांत सिंधू, मिचेल सँटनर, मोईन अली, शेख रशीद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola Horror : अकोल्यात धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, चालकाकडून भंयकर कृत्य, वाचून संताप येईल

Marathi bhasha Vijay Live Updates : वरळी डोममध्ये राज ठाकरेंची व्हॅनीटी व्हॅन दाखल, पाहा व्हिडिओ

Nashik Accident : रिक्षाच्या धडकेत दोन वर्षीय बालकाचा मृत्यू ;घराच्या समोर खेळत असतांना घडला अपघात

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Sarzameen : "यहां हर फैसला एक कुर्बानी है..."; इब्राहिम अली खानच्या 'सरजमीन'चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT