Mumbai Indians : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सला जोरदार धक्का बसलाय. युवा फिरकी गोलंदाज विग्नेश पुथुर दुखापतग्रस्त (Vignesh Puthur injury update) झालाय. त्यामुळे पुथुर यंदाच्या हंगामाला मुकणार आहे. मुंबई इंडियन्सने विग्नेशच्या जागी पंजाबच्या रघु शर्मा याला ताफ्यात घेतलेय. विग्नेश पुथुर याने पदार्पणाच्या हंगामात प्रभावी कामगिरी केली होती.
मुंबईच्या संघात विघ्नेशची जागा ३१ वर्षीय फिरकी गोलंदाज रघु शर्मा याने घेतली आहे. मुंबई इंडियन्सने रघु याला ३० लाख रूपयांच्या बेस प्राईजमध्ये आपल्या ताफ्यात घेतलेय. रघु याने पंजाब संघाचे प्रतिनिधित्व केलेय. रघु याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केली आहे. रघु याने ११ सामन्यात १९.५९ च्या सरासरीने ५७ विकेट घेतल्या आहे. ५६ धावा देऊन सात विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. रघु याने 9 लिस्ट ए सामन्यात १४ विकेट घेतल्या आहेत. तीन टी२० सामन्यात रघुने तीन विकेट घेतल्या आहेत. रघु शर्मा पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळणार आहे.
विग्नेश पुथुरचा प्रभावी मारा -
विग्नेश पुथुर याने यंदाच्या हंगामाद्वारे आयपीएलमध्ये पदार्पण केले. विग्नेश याने पदार्पणाच्या हंगामातच सर्वांना प्रभावित केलेय. विग्नेशने मुंबईसाठी चेन्नईच्या विरोधात पदार्पण केलेय. विग्नेशने पहिल्याच सामन्यात आपल्या कामगिरीने प्रभावित केले. विग्नेशने चेन्नईविरोधात आपल्या पहिल्याच सामन्यात तीन विकेट घेतल्या होत्या. विग्नेश याने यंदाच्या आयपीएल हंगामात पाच सामन्यात सहा विकेट घेतल्या आहेत.
मुंबई इंडियन्ससोबतच राहणार -
युवा फिरकी गोलंदाज विग्नेश पुथुर दुखापतीमुळे उर्वरित हंगामाला मुकणार आहे. आयपीएलमधून एक्झिट झाला असला तरी विग्नेश पुथुर मुंबईच्या संघासोबत राहणार आहे. विग्नेश पुथुर मुंबईच्या संघासोबत दुखापतीवर काम करणार आहे. रिकव्हरीवर मुंबई इंडियन्सचा सपोर्ट स्टाफ करत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.