Mumbai indians team divided into two parts rohit sharma vs hardik pandya know which players supports which player  saam tv news
Sports

Rohit Sharma vs Hardik Pandya: मुंबई इंडियन्समध्ये फुट? हार्दिक विरुद्ध रोहित गटात विभागले खेळाडू?

Mumbai Indians IPL 2024: आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सला ५ वेळेस चॅम्पियन बनवणाऱ्या रोहित शर्माला कर्णधारपदावरुन काढून ही जबाबदारी हार्दिक पंड्यावर सोपवली गेली

Ankush Dhavre

Rohit Shrma vs Hardik Pandya, IPL 2024:

आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सला ५ वेळेस चॅम्पियन बनवणाऱ्या रोहित शर्माला कर्णधारपदावरुन काढून ही जबाबदारी हार्दिक पंड्यावर सोपवली गेली. मात्र हार्दिक पंड्याला संघाचा कर्णधार बनवल्यापासून संघातील वातावरण बिघडल्याचं चित्र दिसून येत आहे. संघ मैदानावर चांगली कामगिरी करु शकत नाहीये. मुंबई इंडियन्सला पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सकडून तर दुसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादकडून दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान या सुमार कामगिरीनंतर संघात दोन गट पडल्याची चर्चा आता वेग धरु लागली आहे.

दैनिक जागरणच्या वृत्तानुसार, रोहितला कर्णधारपदावरुन काढल्यानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये असलेल्या नात्यात खिंडार पडला आहे. मुंबई इंडियन्सच्या ताफ्यत हार्दिक पंड्या विरुद्ध रोहित शर्मा असे दोन गट पडले आहेत. माध्यमातील वृत्तानुसार, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मासह आणखी काही खेळाडू रोहित शर्मासोबत आहेत. तर इशान किशन हार्दिक पंड्यासोबत असल्याचं म्हटलं जात आहे. केवळ खेळाडू नव्हे तर, प्रशिक्षकांमध्येही दोन गट असल्याची चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी हार्दिक पंड्या आल्यानंतर लसिथ मलिंगा उठून गेल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. (Cricket news in marathi)

अंबानी कुटुंबाचा पाठिंबा कोणाला?

मुंबई इंडियन्सचा संघ सुमार कामगिरी करतोय याचा हार्दिक पंड्याला काहीच फरक पडताना दिसत नाहीये. जसप्रीत बुमराहसारखा अनुभवी गोलंदाज असताना हार्दिक पंड्या पहिल्या सामन्यात पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला आला.

त्यानंतर मफाकाला संधी दिली. मफाकाची गोलंदाजीत धुलाई होत होती तरीदेखील त्याच्या ४ षटक पूर्ण केल्या. हार्दिक पंड्याला संघमालक अंबानी कुटुंबाचा पाठिंबा असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे सामना गमावला तरीदेखील त्याच्या चेहऱ्यावरचं हसू काही जात नाही. हार्दिकने हाच अॅटीट्यूड ठेवला,तर मुंबई इंडियन्सला गंभीप परिणाम भोगावे लागु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

OBC Reservation : कुणबी बोगस प्रमाणपत्रांची सखोल पडताळणी होणार; मंत्री बावनकुळे यांच्यांकडून प्रशासनाला आदेश

Attack On Shiv Sena Leader: शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेविकेच्या घरावर हल्ला

Satara Fire : धाड धाड धाड...! साताऱ्यात भर बाजारपेठत एकावर गोळीबार, परिसरात भीतीचे वातावरण

Maharashtra Politics: अजित पवारांवर टीका; आमदाराकडून संजय राऊतांची जीभ हासडण्याची भाषा

शनिशिगणापूरनंतर शिर्डीत ऑनलाईन गंडा,शिर्डी संस्थांनच्या नावानं बोगस वेबसाईट

SCROLL FOR NEXT