Venkatesh Iyer Six: वेंकटेश अय्यरने मारला IPL 2024 स्पर्धेतील सर्वात लांब षटकार;पाहा Video

Longest Six In IPL 2024: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणिर कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात वेंकटेश अय्यरने सर्वात लांब षटकार मारला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
RCB vs KKR IPL 2024 Venkatesh iyer hits 106 meter long six video viral
RCB vs KKR IPL 2024 Venkatesh iyer hits 106 meter long six video viraltwitter
Published On

RCB vs KKR, Venkatesh Iyer Longest Six:

बंगळुरुच्या मैदानावर झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने २० षटकअखेर ६ गडी बाद १८२ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाने १६.५ षटकात ७ गडी शिल्लक ठेऊन हे आव्हान पूर्ण केलं.

कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून फलंदाजी करताना वेंकटेश अय्यरने सर्वाधिक ५० धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने एक गगनचुंबी षटकार मारला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

वेंकटेश अय्यरचा गगनचुंबी षटकार...

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना वेंकटेश अय्यरने ३० चेंडूंचा सामना करत ३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ५० धावा चोपल्या. या वादळी खेळीदरम्यान त्याने या हंगामातील सर्वात लांब षटकार मारला.

या डावात त्याने १०६ मीटर लांब षटकार मारला. हा या हंगामातील सर्वात लांब षटकार आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड इशान किशनच्या नावे होता. इशान किशनने फलंदाजी करताना १०३ मीटर लांब षटकार मारला होता. आता वेंकटेश अय्यरने हा रेकॉर्ड मोडून काढला आहे. (Cricket news in marathi)

RCB vs KKR IPL 2024 Venkatesh iyer hits 106 meter long six video viral
IPL 2024,Fact Check: पाथिराना खरंच धोनीच्या पाया पडला का? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

तर झाले असे की,रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून ९ वे षटक टाकण्यासाठी मयंक डागर गोलंदाजीला आला. या षटकातील चौथ्या चेंडूवर वेंकटेश अय्यरने १०६ मीटर लांब षटकार मारुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

कोलकाता नाईट रायडर्स संघाचा शानदार विजय...

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर कोलकाता नाईट रायडर्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी १८३ धावांचं आव्हान होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार श्रेयस अय्यरने २४ चेंडूत ३९ धावांची नाबाद खेळी केली. आपल्या खेळीदरम्यान त्याने २ चौकार आणि २ षटकार मारले. त्यापूर्वी सलामीला आलेल्या फिल सॉल्ट आणि सुनील नरेनने संघाला आक्रमक सुरुवात करुन दिली. दोघांनी मिळून ६.३ षटकात ८६ धावा जोडल्या. फिल सॉल्टने २० चेंडूत ३० धावांची खेळी केली. तर सुनील नरेनने २२ चेंडूत ४७ धावांची खेळी करत १९ चेंडू शिल्लक ठेऊन संघाला विजय मिळवून दिला.

RCB vs KKR IPL 2024 Venkatesh iyer hits 106 meter long six video viral
RCB vs KKR,IPL 2024: गोलंदाजी, फलंदाजी नव्हे तर या कारणामुळे RCB ने गमावला सामना; फाफ डू प्लेसिसने सांगितलं खरं कारण

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com