IPL 2024,Fact Check: पाथिराना खरंच धोनीच्या पाया पडला का? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

MS Dhoni Matheesha Pathirana- MS Dhoni Viral Video: श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथीशा पथिरानाचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला होता. ज्यात तो धोनीच्या पाया पडताना दिसून आला होता. खरंच तो धोनीच्या पाया पडला का? काय आहे सत्य? जाणून घ्या.
fact checked does really matheesha pathirana touched ms dhoni's feet know the fact amd2000
fact checked does really matheesha pathirana touched ms dhoni's feet know the fact amd2000twitter
Published On

Matheesha Pathirana Touched MS Dhoni's Feet:

आयपीएल २०२४ स्पर्धेत २६ मार्च रोजी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघातील खेळाडूंकडून शानदार खेळ पाहायला मिळाला. या खेळाच्या बळावर चेन्नई सुपर किंग्ज संघाने ६३ धावांनी शानदार विजय मिळवला. या सामन्यानंतर श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथीशा पथिरानाचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला होता. ज्यात तो धोनीच्या पाया पडताना दिसून आला होता. खरंच तो धोनीच्या पाया पडला का? काय आहे सत्य? जाणून घ्या.

काय आहे सत्य?

चेन्नईचा माजी कर्णधार एमएस धोनी हा नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असतो. यावेळी त्याचा आणि मथीशा पथिरानाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला. या व्हिडिओ ज्या अँगलने घेण्यात आला आहे त्यात मथीशा पथिराना एमएस धोनीच्या पाया पडताना दिसून येत आहे. संघातील वरिष्ठ खेळाडूचा आशीर्वाद घेऊन गोलंदाजी करतोय हे पाहून अनेकांनी त्याचं कौतुकही केलं. मात्र त्याने पाया पडल्याच नाही, हे दाखवून देणारा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

fact checked does really matheesha pathirana touched ms dhoni's feet know the fact amd2000
RCB vs KKR,IPL 2024: गोलंदाजी, फलंदाजी नव्हे तर या कारणामुळे RCB ने गमावला सामना; फाफ डू प्लेसिसने सांगितलं खरं कारण

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मथीशा पथिराना आणि एमएस धोनी एकत्र उभे आहेत. त्याचवेळी मथीशा पथिराना खाली वाकतो आणि एमएस धोनीच्या पायाजवळ असलेलं गोलंदाजी मार्क उचलतो. हा व्हिडिओ समोरून काढण्यात आला आहे. त्यामुळे स्पष्टपणे दिसून येत आहे की, मथीशा पथिराना त्याच्या पाया पडला नाही.

तर याआधी व्हायरल झालेला व्हिडिओ हा मागच्या अँगेलने काढण्यात आला होता. त्यामुळे तो धोनीच्या पाया पडत असल्याचं दिसलं होतं. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. त्यामुळे मथीशा पथिरानाने एमएस धोनीच्या पाया पडल्या हा दावा पूर्णपणे खोटा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com