Maharashtra Live News Update: शरद पवार गटाला मोठा धक्का माजी आमदार संदीप नाईक भाजपामध्ये

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: आज शनिवार, दिनांक २० डिसेंबर २०२५, राज्यात नगरपरिषद-नगरपंचायतीसाठी मतदान, राज्यात थंडी कमी झाली, जिल्हा परिषद-महापालिका निवडणुका अपडेट्स, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv
Published On

शरद पवार गटाला मोठा धक्का माजी आमदार संदीप नाईक भाजपामध्ये

माजी आमदार संदीप नाईक यांनी भाजपामध्ये पक्ष प्रवेश केला आहे

विधानसभेमध्ये त्यांनी बंडखोरी केली होती कमी मतांनी त्यांचा पराभूत झाला होता

संदीप नाईक यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी भाजपकडून दिली जाणार आहे

संदीप नाईक भाजपात आल्यामुळे भाजपची ताकद वाढणार आहे

असेच संदीप नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेट घेऊन नवी मुंबईतल्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली

निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या पक्षाला पडली जोरदार खिंडार

अजित पवारांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरात भाजपाचे भोसरी विधानसभा क्षेत्राचे आमदार महेश लांडगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षासह इतर सर्वच पक्षांना जोरदार धक्का दिला आहे.

Parbhani: चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक

परभणी -

भाजपचे नेते तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक

३ दिवसात मुंबईसह सर्वच ठिकाणच्या महापालिका निवडणुकांचे जागावाटप पूर्ण होणार- बावनकुळे

सध्या आम्ही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं बरोबर युती करतोय काही ठिकाणी अजित पवार यांच्याशी ही युती होईल

उद्या निकालात इतिहासात कधी भाजप जेवढ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विजय मिळविला नाही तेवढ्या जागा आम्ही जिंकू

Yavatmal: यवतमाळमध्ये तुफान राडा, उमेदवारांचे दोन गट आमने-सामने

यवतमाळ -

यवतमाळ मध्ये राडा, उमेदवारांच्या दोन गटांमध्ये तुफान राडा

यवतमाळ प्रभाग क्रमांक 15 मधील अंजुमन इंग्लिश स्कूल मतदान केंद्रावर उमेदवारांच्या दोन गटांमध्ये तुफान राडा

दोन्ही गटांमध्ये हाणामारी सुरू झाल्याने पोलिसांनी देखील बळाचा वापर करीत त्यांच्यावर सौम्य लाठीमार करून पांगविले

काँग्रेस व अपक्ष उमेदवारांमध्ये झालेला हा वाद पाहता वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले

Solapur: तुळजापूर येथे हल्ला झालेल्या कार्यकर्त्याची ओमराजे निंबाळकर यांनी घेतली भेट

सोलापूर -

- तुळजापूर येथे हल्ला झालेल्या कार्यकर्त्याची खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतली भेट...

- भाजप आमदार राणा पाटील यांच्यावर जोरदार टीका

- हल्ला झालेलाचा प्रकार किती भयंकर होता हल्ला तुळजापूर येथील घटनास्थळावरून सोलापूर पर्यंत येईपर्यंत एक लिटर रक्त गेलं

- आई तुळजाभवानीच्या कृपेनें ते वेळेत आले आणि डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले त्यामुळे त्यांचा प्राण वाचला

Pune: पुण्यात भाजप पक्षप्रवेशावरून नाराजीनाट्य

पुणे -

पुण्यात भाजप पक्षप्रवेशावरून नाराजीनाट्य

पुणे शहर भाजप कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्त्यांचे आंदोलन

कार्यकर्त्यांचा आत्मदहन करण्याचा इशारा

अमोल देवळेकर यांच्या पक्ष प्रवेशाला विरोध

भाजप पक्ष कार्यालया बाहेर कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी

Pune: पुण्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुलाखती, स्वतः अजित पवार घेणार मुलाखती

पुणे -

स्वतः अजित पवार घेणार उद्या पुण्यात मुलाखती

पुण्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुलाखती

सकाळी ७ वाजल्यापासून अजित पवार घेणार मुलाखती

पुणे शहरातील सर्व प्रभागांच्या सकाळी ७ पासून मुलाखती

पुणे शहरातील ४१ प्रभागातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी अजित पवार मैदानात

Yavatmal: यवतमाळमध्ये मतदान केंद्रावर मतदारांची उसळली मोठी गर्दी

यवतमाळ -

मतदान केंद्रावर मतदारांची उसळली मोठी गर्दी

यवतमाळ पालिकेतील 248 मतदान केंद्रावर मतदारांनी केली गर्दी,साडे पाच वाजता उसळली गर्दी

शेवटच्या टप्प्यात मतदारांनी गर्दी केल्याने पोलिस कर्मचाऱ्यांची उडाली तारांबळ

वेळे अभावी अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागल्याचे शक्यता

Pune: पुणे जिल्ह्यात नगरपरिषद निवडणुकीसाठी आतापर्यंत ४५.१४ टक्के मतदान

पुणे -

पुणे जिल्ह्यातील बारामती फुरसुंगी उरुळी देवाची, दौंड येथील एका लोणावळा येथील २ आणि तळेगाव दाभाडे येथील ५ जागांसाठी निवडणुका सुरू आहेत. या नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत दुपारी ३.३० वाजेपर्यंत ४५.१४ टक्के मतदान.

Nandurbar: नंदुरबारमध्ये निकालाचा एक दिवस अगोदर तळोदा शहरात जादूटोणा

नंदुरबार-

निकालाचा एक दिवस अगोदर तळोदा शहरात जादूटोणा

तळोद्यात अमावस्येच्या रात्री अघोरी जादूटोण्याचा प्रकार नागरिकांमध्ये भीती

रस्त्याच्या मध्यभागी खडूने वर्तुळ, कपडे, बूट, नवीन ताट-वाट्या आणि लिंबू-कुंकू चा अघोरी प्रकार

Pune: आबा बागुल यांनी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश

पुणे -

आबा बागुल यांनी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश

आबा बागुल काँग्रेस चे माजी ज्येष्ठ नेते

विधानसभेला काँग्रेस ने तिकीट नाकारल्यामुळे होते नाराज

आज एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत बागुल यांचा प्रवेश

Pune: आदित्य ठाकरे देणार लोकमान्य नगरला भेट, नागरिकांशी साधणार थेट संवाद

पुणे -

आदित्य ठाकरे देणार लोकमान्य नगरला भेट

लोकमान्य नगरच्या नागरिकांशी आदित्य ठाकरे साधणार संवाद

लोकमान्य नगर मधील घरांचा विषय आदित्य ठाकरे समजून घेणार

लोकमान्य नगरच्या रिडेव्हलपमेंट चा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित

पुण्यातल्या या लोकमान्य नगरच्या रिडेव्हलपमेंटला स्थानिकांनी केला आहे विरोध

आदित्य ठाकरे यांनी भेट देत स्थानिकांशी साधला संवाद

Nanded: धर्माबादमध्ये मतदान केंद्रावर बोगस मतदान करताना महिलेला पकडले

नांदेडच्या धर्माबादमध्ये गोंधळ झालाय

मतदान केंद्रावर बोगस मतदान करताना महिलेला पकडले

तेलंगणातील मतदार आणून धर्माबाद मध्ये मतदान केल्याचा गंभीर आरोप.

बोगस मतदान करणाऱ्या महिलेला धर्माबाद मधल्या स्थानिक महिला उमेदवारांनी दिला चोप.

बोगस मतदारांची पळापळ

Pune: आदित्य ठाकरे यांच्यासमोर वसंत मोरे करणार पुणे महापालिकेची पोलखोल

पुणे -

आदित्य ठाकरे यांच्यासमोर वसंत मोरे करणार पुणे महापालिकेची पोलखोल

प्रेझेंटेशन देत पुणे महानगरपालिकेची करणार पोलखोल

त्यानंतर आदित्य ठाकरे घेणार पत्रकार परिषद

Pune: पुण्यात शिंदे गटाचा काँग्रेसला दे धक्का, बड्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश

स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेचा काँग्रेसला दे धक्का

काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि पुणे महापालिकेचे माजी उप महापौर आबा ऊर्फ उल्हास बागुल यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

उल्हास बागुल यांच्यासह बागुल कुटुंबीय तसेच पुणे महापालिकेतले माजी लोकप्रतिनिधी यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश

पुणे महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी शिंदेंची रणनीती

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील शुभ - दिप निवासस्थानी प्रवेश

Pune: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नाराज पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू

पुणे -

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नाराज पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू

रविंद्र धंगेकर यांच्या उपस्थितीत बैठकीला सुरुवात

पदाधिकारी पक्षाचा राजीनामा देण्याच्या तयारीत

पुणे महापालिका निवडणुकीत भाजप सोबत युती नको अशी मागणी

Mumbai : मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या रांगा

यशवंतराव चव्हाण तृतीय महामार्गावर वाहतुकी चा वेग मंदावला. आज शनिवार आल्यामुळे मुंबईचे पर्यटक मोठ्या प्रमाणात आपल्या खासगी वाहनाने रोडवर आल्यामुळे. वाहतूक कोंडी झालेले आपल्याला बघायला मिळतात.

Maharashtra : अंबरनाथमध्ये पोलिसांकडून लाठीचार्ज

Summary

अंबरनाथच्या मातोश्री नगर परिसरात पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज

भाजपकडून पैसे वाटण्यात आल्याचा शिंदेसेनेचा आरोप

परिसरात तणाव, कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी केला सौम्य लाठीचार्ज

घटनास्थळी पोलिसांचा कडक बंदोबस्त

Washim : वाशिम नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान

वाशिम नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान सुरू आहे, वाशिमच्या लाखाळा भागातील प्रभाग क्रमांक 7 मधील खोली क्रमांक 2 मधील ईव्हीएम मशीन साधारणतः 45 मिनिटांपेक्षा अधिक वेळापासून ईव्हीएम बंद.

Maharashtra : बीड जिल्ह्यातील चार नगरपरिषदाच्या दहा जागांसाठी आज मतदान

बीड जिल्ह्यातील चार नगरपरिषद निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यात बीडमध्ये 1, परळीत 4, धारूरमध्ये 1 आणि अंबाजोगाईमध्ये 4 अशा एकूण 10 जागांसाठी आज निवडणूक मतदान होत आहे. तब्बल आठ वर्षानंतर होत असलेल्या या नगरपरिषद निवडणुकीसाठी अनेक मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Akoal : अकोला महापालिकेत महायुती होणार?

अकोला महापालिकेत महायुती होण्याची शक्यता आहेय. यासंदर्भात महायुतीतील भाजपसह शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याचं बोलतायेत. मात्र, निवडणुक जाहीर झाल्यानंतरही तिन्ही पक्षांच्या स्तरावर कोणतीही प्राथमिक चर्चा, बोलणी आणि निमंत्रण एकमेकांना देण्यात आलेलं नाहीय.

Nagpur : नागपूर कोराडी मार्गावर मध्यरात्री अपघात

- नागपूर कोराडी मार्गावर मध्यरात्री अपघात झालाय.

- मोठे लोखंडी खांब भरलेला ट्रक थेट दुकान परिसरात जाऊन पलटला.

- सुदैवाने मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास हा अपघात झालाय.

भंडाऱ्यात सुरुवातीच्या दोन तासात केवळ 3.26% मतदान

भंडारा शहरातील दोन प्रभागात मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे. प्रभाग क्रमांक 12 आणि 15 मध्ये ही निवडणूक प्रक्रिया होत आहे. दोन प्रभागात 8 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. नव मतदान केंद्रावर ही मतदान प्रक्रिया सुरू झाली असून आठ उमेदवारांसाठी दोन प्रभागातील 8107 मतदार मतदान करणार आहेत. मात्र भंडारा शहराचं असलेलं 9 अंश सेल्सिअस तापमान आणि कडाक्याची थंडी यामुळे मतदारराजाने सध्या तरी मतदान केंद्राकडे पाठ दाखवल्याचं चित्र बघायला मिळत आहे. कडाक्याच्या थंडीमुळे मतदान केंद्रावर शुकशुकाट बघायला मिळत आहे.

भाजपाने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला दिला मोठा धक्का

पिंपरी चिंचवड शहरात भाजपाने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. शिवसेना शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेले संजोग वाघेरे पाटील हे आज (दि.२०) भारतीय जनता पक्ष जाहीर प्रवेश करणार आहेत. मुंबई येथे त्यांचा प्रवेश होणार असून पिंपरी गाव येथून ते मुंबईकडे रवाना झाले आहेत.

नुकताच संजोग वाघेरे पाटील यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. या राजीनाम्या नंतर वाघेरे हे भाजपात प्रवेश करतील अशी जोरदार चर्चा सुरू झाली होती. आज ते भाजपात दाखल होत आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रवेशामुळे शहरात भाजपाची ताकद मोठी वाढणार आहे.

Maharashtra Live News Update : अंबरनाथमध्ये २०८ संशयित बोगस मतदार ताब्यात; पोलीस चौकशी सुरू

अंबरनाथ पोलिसांनी सुमारे २०८ जणांना ताब्यात घेऊन पोलीस ठाणे परिसरातील इमारतीत ठेवले

सर्वांची आधार कार्ड व पॅन कार्डद्वारे सखोल तपासणी सुरू

हे नागरिक मतदानासाठी आले होते का, कोणासाठी मतदान करणार होते याची चौकशी सुरू

भाजप व काँग्रेसकडून काल रात्री २०० बोगस मतदार असल्याचा गंभीर आरोप

भिवंडीवरून आलेले नागरिक कोसगाव परिसरातील सभागृहात आढळले

चौकशीनंतर मतदान प्रक्रियेशी संबंध सिद्ध झाल्यास गुन्हे दाखल करणार

मोहोळ नगर परिषदेच्या दोन प्रभागासाठी आज मतदानाची प्रक्रिया सुरू

थंडी मुळे सकाळच्या टप्यात मतदारांचा ओघ कमी,सोलापूर शहर आणि जिल्ह्यात थंडीचा पारा घसरला

मोहोळमध्ये 11 ते 12 अंश तापमान असल्याने प्रचंड थंडी जाणवत आहे.

मतदान केंद्रांवर मतदार राजा संख्येने कमी,सकाळच्या सत्रात मतदानाला कमी प्रतिसाद

दुपारून मतदारांची गर्दी वाढण्याची शक्यता,सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढाच्या नगरध्यक्षसह 31 जागा,मोहोळ नगरपरिषदच्या दोन प्रभाग,मैंदर्गी आणि पंढरपूर नगरपरिषदेच्या एक प्रभागच्या जागेसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे.

रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रभाग 10 मध्ये आज मातदान

सकाळपासून मतदारांची मतदान केंद्रावर गर्दी

न्यायालयीन प्रक्रियेमुळे लांबली होती प्रभाग 10 ची निवडणूक

दोन नगरसेवकपदांसाठी आज होतंय मतदान

प्रभागात सुमारे 4 हजार 200 मतदार

प्रभागात महायुती विरुद्ध उबाठा अशी थेट

महायुतीतील भाजपचे उमेदवार राजू तोडणकर आणि मानसी करमरकर हे दोन उमेदवार निवडणूक रिंगणात

तर 'उबाठा" कडून राजाराम रहाटे आणि श्वेता कोरगावकर निवडणूक आखाड्यात

प्रभाग क्र. १० मधील अपक्ष उमेदवार सचिन शिंदे आणि संपदा रसाळ-राणा या दोघांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तसेच जिल्हा न्यायालयाकडूनही अवैध ठरवण्यात आले होते

अहिल्यानगरच्या पाथर्डीत मतदारांचा प्रतिसाद

अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यात नगरपरिषद निवडणुकीसाठी आज सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली असून मतदान करण्यासाठी मतदारांनी सकाळपासूनच गर्दी केल्याचे चित्र पहावयास मिळाले. या निवडणुकीत अजित पवार पक्षाच्या उमेदवाराने अचानक नगर घेतल्याने या निवडणुकीत दुरंगी लढत होणार आहे. यामध्ये भाजपच्या आमदार मोनिका राजळे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार शिवाजी गर्जे आणि माजी आमदार चंद्रशेखर घुले तसेच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रताप ढाकणे आणि खासदार निलेश लंके यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नगराध्यक्ष पदासाठी तीन उमेदवार रिंगणात उतरले आहेत. तर 20 नगरसेवकांच्या जागेसाठी 64 उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

आदिवासी विकास मंत्री अशोक उईके कुटुंबासोबत केलं मतदान

यवतमाळ नगरपरिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी भाजप उमेदवार असलेल्या प्रियदर्शनी उईके यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजाविला. त्यांचे वडील आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आणि आई सोबत त्या मतदान केंद्रावर पोहोचल्या. तत्पूर्वी कुटुंबीयांनी त्यांचे औक्षवंन केले. आई-वडिलांचे आशीर्वाद घेऊन प्रियदर्शनी उईके यांनी मतदान केले. यवतमाळकर मतदारांनी लोकशाहीच्या या उत्सवात उत्साहाने सहभागी होऊन अधिकाधिक संख्येने मतदान करावे असे आवाहन मंत्री अशोक उईके यांनी यावेळी केले. तसेच जनता विकासाच्या मुद्द्यावर भाजपालाच मतदान करतील आणि भाजपाचे सर्वाधिक नगरसेवकासह नगराध्यक्ष देखील भाजपाचा विजयी होईल असा विश्वास मंत्री उईके यांनी व्यक्त केला.

nashik-malegaon- मालेगावात समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी अजित पवार गट लढणार मनपा निवडणूक

मालेगाव महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गट पक्षाचे समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली मनपाची निवडणूक पूर्ण ताकदनिशी लढवणार असून उद्या रविवारी दुपारी 1 वाजेच्या दरम्यान संकेत अंपायर येथे विशाल सोनवणे यांच्या कार्यालयात उत्सुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडणार असून इच्छूकांनी वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले असून,मुलखती स्वतः समीर भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

नागपूर महापालिका निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीच्या दहा उमेदवारांची पहिली यादी जाहीर

- महापालिका निवडणूक जाहीर होताच राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत

- तर दुसरीकडे आम आदमी पार्टीने उमेदवारही जाहीर केले आहेत

- महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री भूषण ठाकूरकर आणि नागपूर शहराध्यक्ष अजिंक्य कळंबे यांच्यातर्फे आम आदमी पार्टीच्या दहा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे

- महानगरपालिका निवडणूक लोकांच्या मूलभूत मुद्द्यांवर लढवत असल्याचे आम आदमी पार्टी तर्फे सांगण्यात आले आहे

एक मतदान गावाच्या विकासासाठी - रामदास तडस

आज मतदान होत आहे एक मतदान देश हितासाठी असते एक महाराष्ट्र साठी आणी एक गावाच्या विकासासाठी असते आज सर्वानी मतदानाला येत गावाच्या विकासासाठी मतदान कराव असं आवाहन आहे. भाजपचे सर्व उमेदवार विजयी होतील असा विश्वास आहे - रामदास तडस, माजी खासदार

Maharashtra Live News Update : सोलापुरात सापडला भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूह

सोलापूरच्या बोरामणी गवताळ संरक्षित वन प्रदेशात एक महत्त्वपूर्ण पुरातात्विक शोध लागला आहे.येथे सापडलेला १५-सर्किटचा वर्तुळाकार दगडी चक्रव्यूह हा आतापर्यंत भारतात सापडलेला सर्वात मोठा असा चक्रव्यूह आहे,असे पुण्यातील डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी नमूद केले आहे.

जळगाव जिल्ह्यातील पालिकेच्या १२ जागांसाठी आज मतदानाला सुरुवात

गेल्या २ डिसेंबरला ७७ लोकनियुक्त नगराध्यक्षपदासह अन्य अपील नसलेल्या ठिकाणी ४५२ नगरसेवकांसाठी एक हजार ४८८, असे एक हजार ५६४ उमेदवारांसाठी निवडणूक झाली. मात्र, १२ प्रभागांतील काही उमेदवारांनी हरकती घेतल्याने उच्च न्यायालयाने त्या ठिकाणी २० डिसेंबरला मतदान घेण्यास व २१ डिसेंबरला एकत्रित मतमोजणी करण्याचे आदेश दिले होते.आज अमळनेर १ 'अ', सावदा २ 'ब', ४ 'ब' आणि १० 'ब', यावल ८ 'ब', वरणगाव १० 'अ', १० 'क', पाचोरा ११ 'अ', १२ 'ब' आणि भुसावळ ४ 'ब', ५ 'ब', तसेच ११ 'ब', अशा सहा पालिकांतील १२ प्रभागांत मतदानाला सुरुवात झाली आहे. २ डिसेंबरला झालेले मतदान व शनिवारी होणाऱ्या मतदानाची मतमोजणी रविवारी नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार होणार आहे.

धाराशिव,उमरगा येथील प्रत्येकी तीन प्रभागातील नगरसेवक पदाच्या जागांसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार स्थगित करण्यात आलेल्या धाराशिव मधील तीन प्रभागातील 3 जागा व उमरगा येथील तीन प्रभागातील 3 जागांसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे.धाराशिव मधील नगरसेवक पदाच्या 2 अ, 7 ब 14 ब या तीन ठिकाणी तर दुसरीकडे उमरगा येथे 4, 5 आणि 11 प्रभागात मतदान प्रक्रिया पार पडत आहे.धाराशिव मध्ये या निवडणुकीसाठी भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील,खासदार ओमराजे निंबाळकर,खासदार ओमराजे निंबाळकर,आमदार कैलास पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.तर दुसरीकडे उमरगा येथे भाजप आणि उद्धव ठाकरे शिवसेनेमध्ये लढत असून त्या ठिकाणी ठाकरे शिवसेनेचे आमदार प्रवीण स्वामी तसेच भाजपाचे माजी मंत्री बसवराज पाटील जिल्हा परिषदेचे माजी सभापती अभय चालुक्य यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

महाबळेश्वर नगरपालिकासाठी आज मतदा

सातारा जिल्ह्यातील फलटण आणि महाबळेश्वर नगरपालिका साठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे.फलटण नगरपालिका निवडणुकीच्या नगराध्यक्षपदासाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये थेट लढत असल्याचे पाहायला मिळत आहे.फलटणमध्ये नगराध्यक्ष पदासाठी रामराजे गटाकडून शिवसेनेच्या चिन्हावर अनिकेतराजे नाईक निंबाळकर तर माजी खा. रणजीत नाईक निंबाळकर यांचे बंधू भाजपच्या चिन्हावर समशेर सिंह नाईक निंबाळकर या दोघांमध्ये थेट लढत होत असून आज या लढतीची मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे.

देऊळगावराजा नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात.

देऊळगावराजा नगरपरिषदेच्या निवडणूक मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून कडाक्याच्या थंडीत मतदारांनी मतदान करण्यासाठी रांगा लावल्या आहेत .. जिल्ह्यातील चार ठिकाणी आज मतदान प्रक्रिया पार पाडली जात असून त्यामध्ये देऊळगावराजा पूर्ण, खामगाव, शेगाव व जळगावजामोद येथे काही प्रभागामध्ये मतदान होत आहे..

भंडाऱ्यात दोन प्रभागाच्या 8 उमेदवारांसाठी मतदान प्रक्रिया सुरू

भंडारा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 12 आणि 15 मध्ये आज मतदान होतं आहे. या दोन जागांसाठी 8 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. प्रभाग 12 मध्ये 5 तर, प्रभाग 15 मध्ये 3 उमेदवार उभे आहेत. दोन प्रभागात 9 मतदान केंद्रावर 45 कर्मचारी नियुक्ती करण्यात आले आहे. तापमानाचा पारा 8 अंश डिग्री सेल्सिअस वर पोहोचला असताना कुडकुडत्या थंडीतही भंडाराकर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचला आहे.

यवतमाळ नगरपरिषद करिता मतदानाला सुरुवात

यवतमाळ शहरात 248 मतदान केंद्रावर दोन लाख बत्तीस हजार 315 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. सकाळी साडेसात वाजता पासून मतदानासाठी बूथवर रांगा लागले असून मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे दरम्यान बुध केंद्रावरून मतदारांसोबत अधिक बातचीत केली आमचे प्रतिनिधी संजय राठोड

कडाक्याच्या थंडीतही मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

अकोला जिल्ह्यातीलं बाळापूर नगर परिषदसाठी आज मतदान होत आहे... आज सकाळी साडे 7 वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी साडे 5 या वेळेपर्यत मतदान पार पडणारेये. एकत्रित 40 हजार 572 मतदाराचा मतदानाचा आपला हक्क बजावणार आहेत. 25 जागांसाठी 85 उमेदवार रिंगणात आहे, तब्बलं 43 केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडते आहे. वंचित आणि स्थानिक नगर विकास पार्टीमध्ये येथे आघाडी आहे.. या लढतीत प्रामुख्याने पाहिलं तर एमआयएम, नगर विकास पार्टी आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये लढतीच चित्र आहे

फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीस आज मतदान; नगराध्यक्ष पदासाठी थेट लढत

फुलंब्री नगरपंचायतची सार्वत्रिक निवडणूक शनिवारी, म्हणजेच आज २० डिसेंबर रोजी पार पडत आहे. यापूर्वी ही मतदान प्रक्रिया २ डिसेंबर रोजी होणार होती. मात्र काही कारणांमुळे राज्य निवडणूक आयोगाने ही निवडणूक स्थगित करून पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. अखेर आज शनिवारी नियोजितप्रमाणे मतदान प्रक्रिया राबवली जात आहे. नगराध्यक्ष पदासाठी तीन तर सतरा जागेसाठी 54 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे.

भोकरदन नगर परिषदेच्या दोन जागांसाठी आज मतदान, चार मतदान केंद्रावर होणार मतदान, दोन जागांसाठी सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

जालन्यातील भोकरदन नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 1 अ आणि 9 ब साठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सकाळी साडेसात वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार असून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू असणार आहे. दोन्ही प्रभागासाठी सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून चार मतदान केंद्रांवर हि मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. भोकरदन नगर परिषदेच्या या दोन जागांसाठी तिरंगी लढत होत आहे..

अहिल्यानगर जिल्हयातील 12 पैकी चार नगरपालिकांसाठी मतदान....

कोपरगाव , देवळाली प्रवरा , नेवासा तसेच पाथर्डी नगरपालिकेसाठी मतदान...

मतदान प्रकियेला सुरूवात, मात्र थंडीचा कडाका असल्याने मतदानासाठी अत्यल्प गर्दी..

जिल्ह्याचे तापमान 11 डिग्री सेल्सिययवर...

नेवासा आणि कोपरगाव नगरपालिकेत आजी माजी आमदारांची प्रतिष्ठापणाला....

कोपरगाव मध्ये महायुतीतले पक्ष एकमेकांसमोर तर महाविकास आघाडीचाही पॅनल...

वसमत मध्ये मतदान प्रक्रियेला सुरुवात

हिंगोली जिल्ह्यातील वसमत नगर परिषदेसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे वसमत नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये एकूण 59855 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत यामध्ये तीस हजार पुरुष तर एकोणतीस हजार आठशे 53 महिला मतदारांचा सहभाग आहे दरम्यान 15 प्रभागासाठी 30 नगरसेवक पदाच्या जागेवर 125 नगरसेवक पदाचे उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत तर नगराध्यक्ष पदासाठी 7 महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत दरम्यान शहरातील संवेदनशील मतदान केंद्रावर निवडणूक विभाग व पोलिसांच्या वतीने चोख

अशी सुरक्षा ठेवण्यात आली असून मतदारांनी निर्भीडपणे आपल्या मतदानाचा हक्क बजवा असे आवाहन निवडणूक अधिकाऱ्यांनी केले आहे

अमरावती जिल्ह्यातील अंजणगाव सुर्जी नगरपरिषदेसाठी आज मतदान

नगराध्यक्ष व 28 सदस्यांसाठी मतदान.नगराध्यक्ष पदासाठी 7 तर सदस्य पदासाठी 173 उमेदवार रिंगणात..

काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे, ठाकरे गटाचे आमदार गजानन लवटे, शिवसेनेचे माजी आमदार अभिजीत अडसूळ यांची प्रतिष्ठा पणाला...

आमदार गजानन लवटे यांचे पुत्र यश लवटे देखील निवडणुकीच्या रिंगणात.

शहरात एकूण 52 मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था.

प्रत्येक केंद्रावर केंद्रप्रमुख, मतदान कर्मचारी व महिला कर्मचारी नियुक्त.

संवेदनशील केंद्रांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात.

शहरभर कडेकोट सुरक्षा, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस सज्ज.

मतदारांसाठी आवश्यक साहित्य व सुविधा उपलब्ध.

शांततापूर्ण मतदानासाठी प्रशासनाची पूर्ण तयारी.

Maharashtra Live News Update : अंबरनाथमध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप

अंबरनाथ नगरपालिकेसाठी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर आज अंबरनाथ शहरातील प्रभाग क्रमांक 28 मध्ये दोन जणांना पैशाची पॉकिट वाटत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडलं, त्यानंतर या दोन जणांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी भरारी पथकाच्या ताब्यात दिलं , सध्या घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढील कारवाई सुरू आहे. भाजपच्या उमेदवाराकडून हे पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

Maharashtra Live News Update : उर्वरित नगरपरिषद नगरपंचायतीसाठी आज मतदान

राज्यातील उर्वरित नगर परिषद आणि नगर पंचायतीसाठी आज मतदान होत आहे. पुणे, सोलापूर, कोल्हापूरसह राज्यात मतदान होत आहे. तर २१ तारखेला मतदानमोजणी होणार आहे.

मावळात तापमान १२ अंशांवर; थंडीचा जोर वाढला नागरिक शेकोटी करून घेतायत उब, जनजीवनावर थंडीचा परिणाम..

मावळ तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका लक्षणीयरीत्या वाढला असून आज किमान तापमान थेट १२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले आहे. पहाटेपासूनच वातावरणात गारठा जाणवत असून सकाळ व रात्रीच्या वेळी थंडीचा तीव्र अनुभव नागरिक घेत आहेत. अचानक वाढलेल्या थंडीमुळे मावळ परिसरात जनजीवनावर परिणाम झाला आहे.

थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी शेकोटींचा आधार घेतला असून चौकाचौकात, गल्ल्यांमध्ये आणि वस्ती परिसरात पहाटे व रात्री शेकोटी पेटलेली दिसून येत आहे. विशेषतः वृद्ध नागरिक, लहान मुले, रस्त्यालगत व्यवसाय करणारे विक्रेते तसेच पहाटे कामावर निघणारे कामगार शेकोटीभोवती उभे राहून शरीराला उब देताना दिसत आहेत.

फलटणमध्ये अभिनेता गोविंदा यांच्या प्रचार रॅलीला मोठा प्रतिसाद

फलटण नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाची उमेदवार अनिकेत राजे नाईक निंबाळकर आणि सर्व नगरसेवकांच्या प्रचारासाठी आज अभिनेता गोविंदा यांची रॅली फलटण शहरात काढण्यात आली. या रॅलीला फलटणकरांनी मोठा प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळालं. यावेळी माध्यमांशी बोलताना गोविंदा यांनी मराठीतून संवाद साधत सर्व उमेदवारांना शुभेच्छा दिल्या तसंच मी या दिलेल्या शुभेच्छांना कोणताही दोष लागू नये असं सुद्धा गोविंदा म्हणाले. अनिकेत राजे यांच्या कामातून लोकांचे विचार पूर्णपणे बदलून जातील असं काम त्यांनी कराव अस सुद्धा ते म्हणाले... वाईट बोलणारी लोक नेहमीच दिसत असतात त्यामुळे मी विरोधकांनी केलेल्या टिकेकडे पाहत नाही. चित्रपट स्थापना, रुद्र स्थापना याला महाराष्ट्राची भूमी पुढे आणते. या महाराष्ट्राच्या भूमीला मी सतत नमन करत असतो. बाळासाहेबांच्या कृपेने आम्ही पुढे आलेलो आहोत आमच्यावर त्यांची ही कृपा सदैव राहील असे मत सुद्धा अभिनेता गोविंदा यांनी व्यक्त केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com