MUMBAI INDIANS saam tv
क्रीडा

Mumbai Indian Squad: मुंबईची पलटण तयार ! आगामी हंगामात या तगड्या प्लेइंग ११ सह उतरणार मैदानात

Mumbai Indians Playing XI : मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी मजबूत प्लेइंग ११ निवडली आहे. दरम्यान कशी असेल प्लेइंग ११? जाणून घ्या.

Ankush Dhavre

Mumbai Indians Strongest Playing XI: मुंबई इंडियन्स हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. या संघाने ५ वेळेस आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. गेल्या हंगामात मुंबई इंडियन्सने आपल्या संघात मोठा बदल केला होता.

रोहित शर्माला कर्णधारपदावरुन काढून ही जबाबदारी हार्दिक पंड्याकडे सोपवली होती. हा संघ गेल्या हंगामात सर्वात शेवटी राहिला होता. आता आगामी हंगामासाठी मुंबई इंडियन्सने तगडा संघ बनवला आहे. दरम्यान कशी असेल, मजबूत प्लेइंग ११? जाणून घ्या.

या स्टार खेळाडूंना केलं होतं रिटेन

रोहित शर्मा - १६.३० कोटी

सूर्यकुमार यादव - १६.३५ कोटी

हार्दिक पंड्या (कर्णधार)- १६.३५ कोटी

जसप्रीत बुमराह - १८ कोटी

तिलक वर्मा - ८ कोटी

या स्टार खेळाडूंना घेतलं संघात

मुंबई इंडियन्सने आगामी हंगामासाठी बड्या खेळाडूंना संघात घेतलं आहे. या लिलावात मुंबईने न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेन्ट बोल्टला १२.५ कोटी मोजत आपल्या संघात घेतलं आहे. हा गोलंदाज गेल्या हंगामात राजस्थान रॉयल्सकडून खेळताना दिसून आला होता.

यासह त्याच्याकडे मुंबईकडून खेळण्याचाही अनुभव आहे. यासह चेन्नईचा गोलंदाज दीपक चहरला देखील संघात स्थान देण्यात आलं आहे. मुंबईने दीपक चहरला ९.२५ कोटी मोजत आपल्या संघात स्थान दिलं आहे.

यासह गेल्या हंगामात मुंबईकडून खेळलेल्या नमन धीरला संघात घेण्यासाठी मुंबईने पूर्ण जोर लावला. त्याला ५.२५ कोटी मोजत पून्हा एकदा संघात घेतलं आहे.

यासह मुंबईसाठी नेट गोलंदाजाची भूमिका बजावणारा अल्लाह गजनफरला मुंबईने ४.८ कोटी मोजत संघात स्थान दिलं आहे. यासह भारताचा फिरकीपटू कर्ण शर्माला मुंबईने अवघ्या ५० लाखात आपल्या संघात स्थान दिलं आहे.

आगामी हंगामासाठी अशी असू शकते मुंबई इंडियन्सची मजबूत प्लेइंग ११

रोहित शर्मा, रायन रिकलटन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या ( कर्णधार), विल जॅक्स, मिचेल सँटनर, दीपक चाहर, कर्ण शर्मा, ट्रेन्ट बोल्ट, जसप्रीत बुमराह.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saim Ayub: वनडे क्रिकेटच्या इतिहासात जे कोणालाच जमलं नाही, ते सॅम अयूबने करुन दाखवलं

Beetroot Benefits: हिवाळ्यात बीट खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Constitution Day : संविधान वर्तमान आणि भविष्याचे मार्गदर्शक; संविधान दिनी PM मोदींचा दहशतवाद्यांनाही कडक इशारा

Health Tips: हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ केल्याने मिळतात जबरदस्त फायदे; जाणून घ्या

Maharashtra Politics : मुख्यमंत्रिपदाचा पेच सुटला? भाजपकडून एकनाथ शिंदे यांना दोन ऑफर

SCROLL FOR NEXT