Vaibhav Suryavanshi Father Reaction: सौदी अरेबियातील जेद्दाहमध्ये आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी मेगा लिलाव पार पडला. या लिलावात एकाच खेळाडूची तुफान चर्चा झाली. तो खेळाडू म्हणजे, बिहारचा २३ वर्षीय खेळाडू वैभव सूर्यवंशी.
आयपीएलच्या लिलावात त्याच्यावर राजस्थान रॉयल्सने १.१० कोटींची बोली लावली. यासह तो आयपीएल स्पर्धेसाठी निवड होणारा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे.
एकीकडे त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय, तर दुसरीकडे त्याने वय कमी करुन घेतलंय, अशी सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. दरम्यान आता त्याच्या वडिलांनी याबाबत भाष्य केलं आहे. (Vaibhav Suryavasnshi Real Age)
वैभव सूर्यवंशीने भारतीय अंडर १९ संघासाठी पदार्पण केलं आहे. त्याने ऑस्ट्रेलिया अंडर १९ संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात ५८ चेंडूत तुफानी शतकी खेळी केली होती. त्याच्या वडिलांच्या मते, वैभवने यापूर्वीही बोन टेस्ट केली आहे आणि त्यामध्ये तो पास झाला होता.
वैभवच्या वयाबाबत बोलताना त्याचे वडील म्हणाले, 'ज्यांना शंका असेल, त्यांनी त्याच्या वयाची चाचणी करुन घ्यावी. ज्यावेळी तो साडे आठ वर्षांचा होता, त्यावेळी त्याने बीसीसीआयची पहिली बोन टेस्ट दिली होती. याआधीही त्याच्याकडे भारतीय अंडर १९ संघासाठी खेळण्याचा अनुभव आहे. त्यामुळे आम्हाला तर कसलीच भिती नाही. तुम्ही पुन्हा एकदा त्याच्या वयाची चाचणी करु शकता.'
लिलावाच्या दुसऱ्या दिवशी वैभव सूर्यवंशीचं नाव आलं. त्याचं नाव येताच फ्रेंचायझींनी त्याच्यावर बोली लावायला सुरुवात केली. दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात त्याला संघात घेण्यासाठी चांगलीच स्पर्धा रंगली. शेवटी राजस्थान रॉयल्सने १.१० कोटींची बोली लावत त्याला आपल्या संघात स्थान दिलं.
लिलावानंतर बोलताना त्याचे वडील म्हणाले,' माझ्या मुलाने खूप मेहनत घेतली आहे. वयाच्या ८ व्या वर्षी तिने अंडर १६ स्पर्धेत दमदार कामगिरी केली होती. मी स्वत: त्याला सरावासाठी समस्तीपूरला घेऊन जायचो.' वैभव सूर्यवंशीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या यूथ कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात स्थान दिलं गेलं होतं. त्याने या सामन्यात ६२ चेंडूंचा सामना करत १०४ धावांची खेळी केली होती. या खेळीनंतर तो तुफान चर्चेत आला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.