Mumbai Indians Retention: हिटमॅन आला रे..! रोहित मुंबईकडूनच खेळणार! पलटण या खेळाडूंना करणार रिटेन

Mumbai Indians Retain Players For IPL 2025: येत्या ३१ ऑक्टोबरच्या आधी सर्व फ्रेंचायझींना आपल्या रिटेन केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर करावी लागणार आहेत.
Mumbai Indians Retention: हिटमॅन आला रे..! रोहित मुंबईकडूनच खेळणार! पलटण या खेळाडूंना करणार रिटेन
rohit sharmatwitter
Published On

Retain Players Of Mumbai Indians: आयपीएल २०२५ स्पर्धेआधी डिसेंबर महिन्यात मेगा ऑक्शन होणार असल्याची चर्चा आहे. या लिलावापूर्वी सर्व फ्रेंचाजझींना आपल्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी द्यावी लागणार आहे. या खेळाडूंची यादी देण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर आहे.

त्यामुळे सर्व फ्रेंचायझींच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. स्टार खेळाडूंची भरमार असलेला मुंबई इंडियन्सचा संघ कोणाला ठेवणार आणि कोणाला जाऊ देणार, यावर सर्वांचं लक्ष लागून असणार आहे.

मुंबई इंडियन्सला रोहितला रिटेन करणार?

गेल्या हंगामात मुंबई इंडियन्स संघाने हार्दिक पंड्याला आपल्या संघात स्थान दिलं होतं. त्याला संघात घेतल्यानंतर रोहितला कर्णधारपदावरुन काढलं आणि ही जबाबदारी हार्दिक पंड्यावर सोपवली. त्यामुळे रोहित शर्मा मुंबईची साथ सोडणार अशा चर्चा सुरु आहेत.

मात्र इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, मुंबई इंडियन्स माजी कर्णधार रोहित शर्मा आणि वर्तमान कर्णधार हार्दिक पंड्याला देखील रिटेन करणार आहे. यासह मुंबई इंडियन्स सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराहला रिटेन करु शकते. या चारही खेळाडूंना रिटेन करण्यासाठी मुंबई इंडियन्सला ६१ कोटी मोजावे लागतील. यासह १४ कोटी रुपयात मुंबई इंडियन्स १ परदेशी खेळाडू म्हणून टीम डेव्हिडला रिटेन करु शकते.

इशान किशनला रिलीज करणार

मुंबई इंडियन्सला खेळाडूंना रिटेन करताना काही कठीण निर्णय घ्यावे लागणार आहेत. त्यापैकीच एक निर्णय म्हणजे, मुंबई इंडियन्सला तिलक वर्मा आणि इशान किशनला रिलीज करावं लागेल. हे दोघेही संघातील प्रमुख फलंदाज आहेत.

त्यामुळे मुंबईला कुठल्याही परिस्थितीत हे फलंदाज संघात हवे आहेत. त्यामुळे लिलावात येऊनही मुंबईचा संघ या फलंदाजांना संघात घेण्यासाठी जोर लावताना दिसून येऊ शकतो. मात्र हे मुळीच सोपं नसणार आहे. कारण या स्टार फलंदाजांना संघात घेण्यासाठी सर्वच संघ जोर लावताना दिसून येतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com