रणजीत माजगावकर, साम टीव्ही
मुंबई : विधानसभा निवडणूक झाल्यानंतर महायुतीत मुख्यमंत्रिपदाचा पेच पाहायला मिळत आहे. भाजप आणि शिंदे गटानेही मुख्यमंत्रिपदावर दावा केला आहे. दोन्ही पक्षाचा मुख्यमंत्रिपदावर डोळा आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष मुख्यमंत्रिपदसाठी आग्रही असल्याची माहिती हाती आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा तिढा दिल्ली दरबारी गेला आहे. याचदरम्यान, भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दोन ऑफर दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं. या निवडणुकीत भाजपने १३२ जागांवर बाजी मारली. तर शिंदे गटाने ५७ जागांवर बाजी मारली. अजित पवार गटाने ४१ जागा जिंकल्या. महायुतीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. महाविकास आघाडीला फक्त ४८ जागा जिंकता आल्या आहेत. त्यामुळे महायुतीचं पारडं जड आहे. यानंतर महायुतीकडून सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार आहे. मात्र, महायुतीपुढे मुख्यमंत्रिपदाचा मोठा पेच उभा ठाकला आहे. महायुतीतील भाजप आणि शिंदे गटाने मुख्यमंत्रिपदावर लक्ष्य केंद्रीत केलं आहे.
शिंदे गटाची समजूत काढण्यासाठी भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दोन ऑफर दिल्या आहेत. तसेच केंद्रीय मंत्रीमंडएळात स्थान देण्याची देखील भाजपची तयारी आहे. तर राज्यात उपमुख्यमंत्रिपदाची देखील ऑफर दिली आहे. तर मुख्यमंत्रिपद भाजपकडेच राहणार असल्याची माहिती मिळत आहे,अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्रिपदाच्या पेचादरम्यान एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांना त्यांच्या मतदारसंघात परतण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिल्यानंतर शिंदे गटाचे सर्व आमदार आज रात्री त्यांच्या मतदारसंघात परतणार आहेत. पुढील निरोप येईपर्यंत मतदारसंघात जाण्याचे मुख्यमंत्री शिंदेंनी आमदारांना आदेश दिले आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज संध्याकाळी उशिरा मुंबईत येण्याची शक्यता आहे. आज केंद्रीय गृहमंत्री आज मंगळवारी आले नाही, तर थेट दोन दिवसांनंतर येतील, अशी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी माहिती दिली आहे. भाजपचे वरिष्ठ नेते आणि काही आमदार अलर्टवर असल्याची माहिती मिळत आहे.
मागील सरकारमध्ये मंत्री राहिलेले भाजपचे आमदार, पक्षाचे प्रमुख पदाधिकारी असलेले आमदार मुंबईमध्ये थांबलेले आहेत. अचानक मीटिंग बोलावली, पळापळ नको म्हणून भाजप पक्षाचे आमदार अलर्टवर असल्याची माहिती मिळत आहे. तर दुसरीकडे अजित पवार देखील दिल्लीला जाण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.