मुंबई : भाजपने राज्यात मुख्यमंत्रिपदासाठी बिहार पॅटर्नला नकार दिल्याची माहिती आहे. भाजपकडून महराष्ट्रात भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा, असं दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांचं मत आहे. भाजप मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही आहे. दुसरीकडे शिंदे गटाकडूनही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री मिळावं, यासाठी आग्रही आहे. याचदरम्यान, अमित शहा उद्याच मुंबईत येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे पडद्यामागे नेमकं काय घडतंय, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. निरीक्षक म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असण्याची शक्यता आहे. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्याच मुंबईत येणार असल्याची माहिती मिळाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपचा विधिमंडळ गटनेता निवडला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर केंद्रीय गृहमत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्रिपदाच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सकाळी ११ वाजता राज्यपालांची भेट घेणार आहेत. या भेटीत ते मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्या सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरल्याची माहिती मिळाली आहे. येत्या गुरुवार म्हणजे २८ नोव्हेंबर रोजी शपथविधी होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. तर पुढील दोन दिवसात मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यासह मंत्रिपदांच्या वाटपाबाबतच सूत्र आणि मंत्र्यांची नावे निश्चित केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या मुलीच्या रिसेप्शनसाठी देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आज रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती हाती आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.