Constitution Day : संविधान वर्तमान आणि भविष्याचे मार्गदर्शक; संविधान दिनी PM मोदींचा दहशतवाद्यांनाही कडक इशारा

PM Modi Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित केले. संविधान हा भारताला मार्ग दाखवतो, असं मोदी म्हणाले.
PM narendra Modi
PM narendra Modi saam tv
Published On

संविधान आपल्या वर्तमान आणि भविष्याचे मार्गदर्शक आहे. मागील ७५ वर्षांत देशासमोर जी आव्हाने आली आहेत, त्यावर मात करण्यासाठी संविधानानं आपल्याला योग्य मार्ग दाखवला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी देशातील नागरिकांना संविधान दिनानिमित्त शुभेच्छाही दिल्या.

विकसित भारत हे देशातील प्रत्येक नागरिकाचं लक्ष्य आहे. संविधानानं भारताला योग्य मार्ग दाखवला आहे. भारताच्या संविधानाचं हे ७५ वे वर्ष संपूर्ण देशासाठी गौरवशाली बाब आहे, असे मोदी यावेळी म्हणाले. जम्मू-काश्मीरमध्ये संविधान आता पूर्णपणे लागू झाला. तिथे पहिल्यांदाच संविधान दिन साजरा करण्यात आला, हे सांगतानाच भारताच्या सुरक्षिततेला आव्हान देणाऱ्या प्रत्येक दहशतवादी संघटनेला सडेतोड उत्तर दिले जाईल असा इशाराही त्यांनी दिला.

आमचं संविधान आपले वर्तमान आणि भविष्याचे मार्गदर्शक आहे. संविधानामुळं ताकद मिळाली आहे. त्यामुळे आज जम्मू-काश्मीरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान पूर्णपणे लागू झाले आहे, असेही मोदी म्हणाले.

आज लोकशाहीला स्मरण करण्याचा दिवस आहे. संविधानाने आणीबाणीचाही सामना केला, असेही ते म्हणाले. आजच्या घडीला १२ कोटी लोकांना नळाद्वारे पाणी दिले जात आहे. मोठ्या संख्येने लोकांना पक्की घरे मिळाली आहेत. आम्ही तृतीयपंथींना वेगळी ओळख मिळवून दिली. अशा प्रकारे आम्ही संविधानाच्या भावनांना आणखी सशक्त केले. लोकांच्या आयुष्यातील अडचणी संपवण्यावर भर दिला जात आहे. प्रत्येकाचे जीवन सुलभ करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे मोदी म्हणाले.

PM narendra Modi
PM Modi: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी PM मोदींचं नव्या खासदारांना आवाहन, म्हणाले...

गेल्या दहा वर्षांत ५३ कोटींहून अधिक भारतीयांची बँक खाती सुरू केली आहेत. हे लोक कधी बँकेच्या दरवाजापर्यंतही पोहोचू शकत नव्हते. जे अनेक पिढ्यांपासून बेघर होते, अशा ४ कोटी भारतीयांना गेल्या दहा वर्षांत पक्की घरे दिली आहेत. आपल्या घरात गॅस कधी पोहोचेल, याची प्रतीक्षा करणाऱ्या १० कोटींहून अधिक महिला आहेत, त्यांना गेल्या दहा वर्षांत मोफत गॅस जोडणी दिली आहे, असे मोदी यांनी यावेळी सांगितले.

PM narendra Modi
Narendra Modi : 'पराभूत होणाऱ्यांना संसदेत...'; हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी PM मोदी विरोधकांवर कडाडले

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com