mumbai indians yandex
Sports

Mumbai Indians,IPL 2025: मुंबई इंडियन्स हार्दिक पंड्याला रिलीझ करणार? हा खेळाडू होऊ शकतो नवा कर्णधार

Mumbai Indians Captain: आयपीएल २०२५ स्पर्धेपूर्वी होणाऱ्या मेगा ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सचा संघ हार्दिक पंड्याबाबत मोठा निर्णय घेऊ शकतो.

Ankush Dhavre

आयपीएळ २०२५ स्पर्धेत मोठे बदल पाहायला मिळणार आहे. ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे. मेगा ऑक्शनमध्ये आपल्या आवडत्या संघातील स्टार खेळाडू दुसऱ्या संघाकडून खेळताना दिसतील. तर दुसऱ्या संघातील स्टार खेळाडू आपल्या आवडत्या संघाकडून खेळताना दिसून येऊ शकतात. दरम्यान मेगा ऑक्शनच्या पार्श्वभूमीवर मुंबई इंडियन्स संघ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे. माध्यमातील वृत्तानुसार मुंबई इंडियन्स हार्दिक पंड्याला रिलीज करणार आहे.

आयपीएल २०२४ स्पर्धेतील लिलावापूर्वी हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्स संघात परतला होता. हार्दिक पंड्याने आयपीएल २०२२ आणि २०२३ स्पर्धेत गुजरात टायटन्स संघाचं नेतृत्व केलं होतं. दरम्यान मुंबईने त्याला ट्रेड करत आपल्या संघात घेतलं आणि रोहितची कर्णधारपदावरुन सुट्टी केली. ही जबाबदारी हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आली. मात्र हा निर्णय चुकीचा ठरला आणि हे हंगाम हार्दिक पंड्यासाठी वाईट स्वप्नापेक्षा कमी नव्हतं.

हा खेळाडू होणार मुंबई इंडियन्सचा कर्णधार?

जर मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला रिलीज करण्याचा निर्णय घेतला, तर या संघाला नव्या कर्णधाराची गरज असेल. माध्यमातील वृत्तानुसार,हार्दिक पंड्यानंतर ही जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे सोपवली जाऊ शकते. सूर्यकुमार यादव हा भारतीय टी-२० संघाचा कर्णधार आहे. त्यामुळे त्याला या जबाबदारीसाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. आता मुंबई इंडियन्स काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळताना मुंबई इंडियन्सचा संघ सर्वात शेवटी राहिला. या संघाला एका पाठोपाठ एक सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. ५ वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्स संघाला १४ पैकी केवळ ४ सामने जिंकता आले. या फ्लॉप कामगिरीनंतर आगामी हंगामासाठी टीम मॅनेजमेंट मोठे निर्णय घेऊ शकते. दरम्यान खेळाडूंसह प्रशिक्षकांमध्येही बदल पाहायला मिळू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एक व्यासपीठ, दोन ठाकरे...महाराष्ट्रातील राजकारण ३६० डिग्री फिरणार, दोन्ही नेत्यांपुढे आव्हाने काय?

Marleshwar Waterfall : रत्‍नागिरीतील मार्लेश्वर धबधब्याचे सौंदर्य जणू स्वर्गच, पावसाळ्यात एकदा भेट द्याच

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Sushil Kedia: सुशील केडियांच्या ऑफिस फोडणाऱ्या ५ जणांना अटक! वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, कोणती कलमे लावली? VIDEO

Maharashtra Live News Update: सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या खांबटकी घाटात ट्रकला मोठी आग

SCROLL FOR NEXT