Mumbai Indians lose for the fourth time in a row; Nita Ambani calls to players directly Saam Tv
क्रीडा

IPL 2022: मुंबई इंडियन्सचा सलग चौथ्यांदा पराभव; नीता अंबानींचा खेळाडूंना थेट कॉल

IPL 2022 Latest News: यंदाच्या आयपीलमध्ये मुंबई इंडियन्सची सुरुवात निराशाजनक झाल्याने संघाचं मनोबल वाढवण्यासाठी नीता अंबानी यांनी खेळाडूंशी थेट संवाद साधला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मुंबई इंडियन्सला आयपीएल 2022 मध्ये झालेल्या सामन्यांमध्ये प्रतिस्पर्धी संघाकडून सलग चारवेळा पराभव पत्कारावा लागल्याने मुंबईचा संघ या स्पर्धेतून बाहेर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) यापूर्वी झालेल्या आयपीएलच्या स्पर्धेत पाचवेळा विजय मिळवला आहे. मात्र, यंदाच्या आयपीलमध्ये मुंबई इंडियन्सची सुरुवात निराशाजनक झाल्याने संघाचं मनोबल वाढवण्यासाठी नीता अंबानी यांनी (Nita Ambani) खेळाडूंशी थेट संवाद साधला आहे. (Mumbai Indians lose for the fourth time in a row; Nita Ambani calls to players directly)

हे देखील पहा -

भारतीय क्रिकेट (Cricket) संघाचा कर्णधार रोहीत शर्मा मुंबई इंडियन्सला विजय मिळवून देण्यासाठी क्रिकेटच्या मैदानात नवनवीन योजना आखतो. मात्र, आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये प्रतिस्पर्धी संघाकडून दारूण पराभव झाल्याने चेन्नईपाठोपाठ मुंबईलाही भोपळाच मिळाला आहे. नुकत्याच झालेल्या रॉयल चॅंलेंजर्स बंगळुरु आणि मुंबई इंडियन्सच्या सामन्यात बंगळुरुने ७ विकेट्स राखून मुंबईचा पराभव केला. त्यानंतर मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी यांनी खेळाडूंशी थेट फोनवर चर्चा करुन त्यांचं मनोबल वाढवलं.

काय म्हणाल्या नीता अंबानी ?

मुंबई इंडियन्सच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये नीता अंबानी ड्रेसिंग रुममध्ये असलेल्या मुंबईच्या खेळाडूंना आणि सहकाऱ्याचं मनोबल वाढवताना दिसत आहेत. व्हिडीओद्वारे संवाद साधत असताना अंबानी म्हणतात, मला तुमच्या सर्वांवर पूर्ण विश्वास असून आता आपण सगळे जिंकायला चाललो आहोत, असा भरवसा एकमेंकावर ठेवूया. तसंच त्या पुढं म्हणाल्या, यापूर्वीही आपण या परिस्थितीतून गेलो आहोत परंतु आपण धीर न सोडता पुढे जात राहिलो. अशा कठीण परिस्थितीला सामोरं जावून आपण स्पर्धेत विजय मिळवला आहे. एकमेकांना साथ दिल्यास आपण यंदाच्या स्पर्धेतही जिंकू शकतो. एकमेंकावर विश्वास ठेवा आणि तुम्हाला जे काही हवं आहे त्यासाठी माझं संपूर्ण सहकार्य असेल असं निता अंबानी म्हणाल्या आहेत.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

How to Wake Up Earlier: आयुष्यात यश हवं तर लवकर उठा; जाणून घ्या पहाटे ५ वाजता उठण्याचे आश्चर्यकारक फायदे

Health Tip: हिवाळ्यात स्ट्रॉबेरी खा अन् आजारांपासून राहा दूर

Tiffin Recipes : लहान मुलांच्या डब्यासाठी बनवा केळीपासून 'हा' खास पदार्थ

Maharashtra Election : मी काय म्हातारा दिसायला लागलो का? अजित पवार असं का म्हणाले, बघा VIDEO

Shukra Chandra Yuti: शुक्र-चंद्राची युती देणार पैसाच पैसा; दिवाळीनंतरही 'या' राशींच्या घरी येणार धन

SCROLL FOR NEXT