काजू खाल्ल्याने पुरुषांना होतात 'हे' जबरदस्त फायदे

Benefits Cashew for Men's: काजू खाल्ल्याने पुरुषांना अनेक फायदे होतात. काय आहेत हे फायदे? याची सविस्तर माहिती जाणून घ्या.
benefits of eating cashew for men read the full article
benefits of eating cashew for men read the full articleSaam Tv News
Published On

मुंबई: आरोग्य निरोगी आणि उत्तम राहण्यासाठी आहारात प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश असणे गरजेचे असते. पिळदार शरीरयष्टी करण्यासाठी अनेक बॉडीबिल्डर्स आपल्या आहारात ड्रायफ्रूट्सचा समावेश करतात. या आहारात काजू, पिस्ता, बदाम, शेंगदाणे आदी पदार्थांचं सेवन केल्यानं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते. अनेकांना काजू (cashew) खाणे आवडतं. त्यामागचं कारणही तितकचं महत्वाचं आहे. काजू खाल्ल्याने पुरुषांना अनेक फायदे होतात. काय आहेत हे फायदे? याची सविस्तर माहिती जाणून घ्या. (benefits of eating cashew for men read the full article)

हे देखील पहा -

काजूचे फायदे :

काजूमध्ये अनेक पौष्टिक तत्त्वे असल्याने ते खाल्ल्यावर अनेक आजारांपासून बचाव होण्यास मदत होते. काजूमध्ये पॉलिफेनोल्स आणि कॅरोटेनायड्स हे अॅंटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे हृदय निरोगी राहतं. तसंच पाण्यात भिजवलेले काजू खाल्ल्याने पचनक्रिया उत्तम राहते आणि पोटाच्या विकांरापासूनही बचाव होतो.

पाण्यात भिजवलेले काजू खाल्ल्याने होतात जबरदस्त फायदे

१) फायटिक अॅसिड कमी होतो

सुक्या काजूमध्ये फायटिक अॅसिड असतो. ज्यामुळे शरीरातील पचनक्रियेत अडथळा निर्माण होतो. मात्र काजू पाण्यात भिजवून खाल्ल्याने त्यामध्ये असलेला फायटिक अॅसिड कमी होतो आणि पचनक्रियाही चांगली राहते. फायटिक अॅसिडमुळे पोटाचे विकार होण्याची शक्यता असते. त्यामुळे भिजवलेले काजू खाणे हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

२) शरीरात पोषक तत्त्वे वाढवण्यासाठी काजू खा

काजूमध्ये असलेला फायटिक अॅसिड आरोग्यासाठी घातक असतो. तसंच तो शरीरातील खनिजांचे प्रमाणही कमी करतो. परंतु, काजू पाण्यात भिजवून खाल्ल्याने या समस्येपासून सुटका होते. तसंच शरीरातील लोह, झिंक, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि मॅंगनिजचे प्रमाण वाढवतं आणि फायटिक अॅसिड कमी झाल्याने त्याचा आरोग्यासाठी फायदा होतो.

३) वजन कमी करण्यासाठी काजू फायदेशीर

पाण्यात भिजवलेल्या काजूमध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर, प्रथिनं असतात. त्यामुळे चायपचायाची प्रक्रियाही चांगली होते. त्यामुळे वजन कमी होण्यासाठी त्याचा फायदा होतो. तसंच सतत भूक लागत नाही.

benefits of eating cashew for men read the full article
महात्मा फुले - सावित्रीमाईंच्या समाजकार्यावर बायोपिक; मुख्य भूमिकेत कोण?

४) शरीरातील कोलेस्ट्र्रॅाल कमी करतो

भिजवलेले काजू खाल्ल्याने शरीरातील कोलेस्ट्र्रॅाल कमी होण्यास मदत होते. त्यामुळे वजन कमी होण्यास त्याचा फायदा होतो. शरीरातील खराब कोलेस्ट्र्रॅाल (LDL) कमी करुन चांगलं कोलेस्ट्रॅाल (HDl)ला अधिक चांगलं करण्यास भिजवलेले काजू खाल्ल्याने मदत होते.

५) काजू ब्रेन बुस्टर

भिजवलेले काजू मेंदूसाठी पोषक ठरते. काजूमध्ये पोषक तत्त्वे असल्याने मेंदूला चालना मिळण्यासाठी तसेच तुमची स्मरणशक्ती चांगली होण्यास मदत होते.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com