Mumbai Indians vs punjab kings Saam tv
Sports

मुंबई इंडियन्सचा फ्लॉप शो सुरूच; पंजाब किंग्सचे खेळाडू चमकले, संघाची विजयी घौडदौड

Mumbai Indians vs punjab kings news : मुंबई इंडियन्सचा फ्लॉप शो सुरूच असल्याचे दिसत आहे. पंजाब किंग्सच्या विजयाने गुणतालिकेत मोठं फेरबदल झाला आहे.

Saam Tv

मुंबई इंडियन्सकडून पराभवाची मालिका सुरूच

पंजाबकडून मुंबई इंडियन्सचा पराभव

डिकॉकचं नाबाद शतक व्यर्थ

पंजाब किंग्सने गुरुवारी वानखेडे स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्सचा सात गडी राखून पराभव केला. मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ विकेट गडी गमावून १९५ धावा केल्या. या धावांचं आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पंजाब किंग्सने चांगलीच फलंदाजी केली. पंजाब किंग्सने १६.३ षटकात ३ विकेट गमावून सामना जिंकला.

मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्सच्या विरोधात फलंदाजी करताना २० षटकात ६ गडी गमावून १९५ धावा कुटल्या. मुंबईसाठी डिकॉकने नाबाद ११२ धावा केल्या. तर पंजाबसाठी अर्शदीप सिंहने तीन विकेट घेतल्या. १९६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबला पॉवरप्लेमध्ये दोन झटके बसले.

प्रियांश आर्याने ९ चेंडूत १५ तर कूपरने १२ चेंडूत १७ धावा केल्या. श्रेयस अय्यरने ३५ चेंडूत ६६ धावा कुटल्या. सलामीवर फंलदाज प्रभसिमरनने ३९ चेंडूत ११ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ८० धावा पूर्ण केल्या.

मुंबई इंडियन्सची सामन्याच्या सुरुवातीपासूनच खराब सुरुवात झाली. अर्शदीप सिंहने दुसऱ्या षटकात रयान रिकल्टन आणि सूर्यकुमार यादवला तंबूत पाठवलं. नमन धीर ३१ चेंडूत ५० धावा करून बाद झाला. हार्दिक पंड्या १२ चेंडूत १४ धावा करून बाद झाला. तर डिकॉकने ६० चेंडूत नाबाद ११२ धावा कुटल्या. त्याने ८ चौकार आणि ७ षटकार लगावले. तिलक वर्मा फक्त ८ धावा करू शकला. नमन धीर आणि डीकॉकने ११२ धावांची भागीदारी रचली. तर पंजाबासाठी अर्शदीपने २२ धावा देऊन ३ गडी बाद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT