KKR च्या सुमार कामगिरीने शाहरुख खान भडकला? व्हायरल व्हिडिओमुळे चर्चांना उधाण, VIDEO

Shah Rukh Khan news update : KKR च्या सुमार कामगिरीने शाहरुख खान भडकल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. या व्हायरल व्हिडिओमुळे चर्चा सुरू झाली आहे.
shah rukh khan viral video
shah rukh khan Saam tv
Published On
Summary

IPL 2026 मध्ये KKR ची कामगिरी निराशाजनक दिसून येत आहे

केकेआर संघाने अद्याप एकही सामना जिंकलेला नाही

शाहरुख खानच्या व्हायरल व्हिडिओने सोशल मीडियावर चर्चांना उधाण

IPL 2026 स्पर्धेत कोलकाता नाइट रायडर्सने निराशजनक कामगिरी केली आहे. या स्पर्धेत संघाने एकही सामना जिंकता आलेला नाही. सुरुवातीच्या दोन सामन्यात केकेआरला पराभवाला सामोरे जावं लागलं. पंजाब किंग्सच्या विरोधातील सामना पावसामुळे रद्द झाला होता. यादरम्यान शाहरुख खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

shah rukh khan viral video
IPL 2026 : धोनीच्या चेन्नईची अवस्था बिकट; पॉईंट्स टेबलमध्ये थेट तळाशी, प्लेऑफमध्ये जाणार का?

व्हायरल व्हिडिओमध्ये शाहरुख खान हा CEO वेंकी मॅसोर यांच्या बोलताना दिसत आहे. शाहरुख खान बोलताना रागात असल्याचे दिसत आहे. पंजाब किंग्सचा कोलकाता नाइट रायडर्स विरोधात ईडन गार्डन्स स्टेडियमवर सामना झाला. चौथ्या शतकापर्यंत केकेआरने २२ धावांवर २ गडी गमावले होते. त्यानंतर पाऊस आल्याने सामना थांबवण्यात आला. त्यानंतर दोघांमध्ये गंभीर स्वरुपाची चर्चा सुरू असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओवरून शाहरुख खान भडकल्याचे दिसत आहे. संघाच्या कामगिरीवरून मॅनेजमेंटवर खूश नसल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

कोलकाता नाइट रायडर्सचा आयपीएल स्पर्धेत पहिला सामना मुंबई इंडियन्सविरोधात झाला. केकेआरने मुंबई इंडियन्ससमोर २२१ धावांचं आव्हान होतं. परंतु मुंबई इंडियन्सने ६ गडी राखून विजय मिळवला. अशीच परिस्थिती सनरायझर्स हैदराबाद विरोधातही झाली. सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांनी कोलकाताच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. सनरायझर्स हैदराबादने २२६ धावा ठोकल्या.

shah rukh khan viral video
IPL Point Table: पावसामुळे IPLच्या पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर; कोणत्या संघाचं गणित बिघडलं? कोण-कोणत्या संघाच्या पॉईंट्सवर फेरलं पाणी?

केकेआरचे नेतृत्व करणाऱ्या अंजिक्य राहणेचा संघ अवघ्या १६१ धावांवर बाद झाला. ६५ धावांच्या फरकाने केकेआरला पराभवाचा सामना करावा लागला. पंजाब किंग्सच्या विरोधातही केकेआरची फलंदाजी चांगली नव्हती. केकेआरने अवघ्या ३.४ षटकात २ गडी गमावले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com