rohit sharma twitter
Sports

Mumbai Indians: रोहित शर्मा पलटणची साथ सोडणार? मुंबई इंडियन्स या खेळाडूंना करणार रिटेन

Mumbai Indians Retain Players: आगामी आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सचा संघ कोणत्या खेळाडूंना रिटेन करु शकतो? जाणून घ्या.

Ankush Dhavre

मुंबई इंडियन्स हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. या संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना ५ वेळेस आयपीएलची ट्रॉफी उंचावली. मात्र आयपीएल २०२४ स्पर्धेत या संघाला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती.

गेल्या हंगामात मुंबईने रोहित शर्माला कर्णधारपदावरुन काढून हार्दिक पंड्याकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवली. मात्र हा निर्णय पूर्णपणे फसला. हा संघ गुणतालिकेत सर्वात शेवटी होता. दरम्यान आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी रिटेंशनचे नवे नियम जाहीर करण्यात आले आहेत. मुंबई इंडियन्सचा संघ कोणत्या खेळाडूंना रिटेन करु शकतो? जाणून घ्या.

हार्दिक पंड्या

मुंबईने गेल्या हंगामात हार्दिक पंड्याला आपल्या ताफ्यात स्थान दिलं आणि रोहितला कर्णधारपदावरुन काढून ही जबाबदारी हार्दिक पंड्याकडे सोपवली. मात्र त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईला हवी तशी कामगिरी करता आली नाही. मात्र तरीही मुंबईचा संघ त्याला रिटेन करु शकतो. कारण त्याने फलंदाजीत २१६ धावा आणि गोलंदाजी करताना ११ गडी बाद केले होते.

रोहित शर्मा

रोहित शर्माने मुंबई इंडियन्सकडून खेळताना धावांचा पाऊस पाडला होता. तो गेल्या हंगामात मुंबईकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. या हंगामात फलंदाजी करताना त्याने १५० च्या स्ट्राईक रेटने १४ सामन्यांमध्ये ४१७ धावा केल्या होत्या. त्यामुळे मुंबईचा संघ रोहितलाही रिटेन करु शकतो.

सूर्यकुमार यादव

सूर्यकुमार यादव हा मुंबई इंडियन्स संघातील सर्वात आक्रमक फलंदाज आहे. तसेच तो भारतीय संघाचा कर्णधार देखील आहे. गेल्या हंगामात फलंदाजी करताना त्याने ३४५ धावा केल्या होत्या. या हंगामात तो मुंबई इंडियन्सकडून तिसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.

तिलक वर्मा

तिलक वर्मा हा मुंबई इंडियन्स संघातील सर्वात विश्वासू फलंदाजांपैकी एक आहे. जेव्ह जेव्हा संघ अडचणीत असतो, त्यावेळी तिलक वर्मा मध्यक्रमात फलंदाजी करताना संघाचा डाव सांभाळतो. त्याने गेल्या सामन्यात ३ अर्धशतकं झळकावली होती. त्यामुळे मुंबईचा संघ त्याला रिटेन करु शकतो.

जसप्रीत बुमराह

जसप्रीत बुमराह हा भारतीय संघातील सर्वात अनुभवी गोलंदाज आहे. बुमराहच्या आयपीएल प्रवासाची सुरुवात ही मुंबई इंडियन्स संघापासून झाली होती. मुंबईला चॅम्पियन बनवण्यात जसप्रीत बुमराहने मोलाची भूमिका बजावली आहे. कुठल्याही परिस्थितीत मुंबई इंडियन्स जसप्रीत बुमराहला सोडणार नाही.

इशान किशन

मुंबई इंडियन्ससाठी डावाची सुरुवात करणाऱ्या इशान किशनने गेल्या हंगामातही संघाला चांगली सुरुवात करुन दिली होती. त्याने गेल्या हंगामात १४ सामन्यांमध्ये ३२० धावा केल्या होत्या. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा संघ त्याला देखील रिटेन करु शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahu Gochar 2026: पुढच्या वर्षी राहू करणार शनीच्या राशीत प्रवेश; 'या' राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ

Maharashtra Live News Update: भाजपचे आमदार संजय केनेकर यांची उद्धव ठाकरेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

Bigg Boss 19: 'मी टीव्हीचा सुपरस्टार आहे...'; बिग बॉसमध्ये नवा वाद, फरहानाला गौरवने सुनावले खडेबोल

Ind vs Aus: भारताने पुन्हा टॉस गमावला; ऑस्ट्रेलियाच्या संघात ४ मोठे बदल, पाहा प्लेईंग ११

Raj Thackeray : पुण्यामध्ये राज ठाकरे संतापले; पदाधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल, म्हणाले '...तर पदं सोडा'

SCROLL FOR NEXT