MS Dhoni X
Sports

MS Dhoni Troll : हा कसला सैनिक... पहलगाम दहशतवादी हल्यावर मौन, महेंद्रसिंह धोनी नेटकऱ्यांच्या निशाण्यावर

Mahendra Singh Dhoni : पहलमाग येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २८ जणांचा मृत्यू झाला, अनेकजण हल्ल्यामध्ये जखमी झाले. या घटनेवर प्रतिक्रिया न दिल्याने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला सोशल मीडियावर नेटकरी ट्रोल करत आहेत.

Yash Shirke

Pahalgam Terrorist Attack : काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथे मंगळवारी (२२ एप्रिल) दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी गोळ्या घालून २८ निष्पाप नागरिकांचा जीव घेतला. गोळीबारामध्ये अनेकजण जखमी देखील झाले. भ्याड हल्यानंतर देशभरात संतापाची लाट पसरली. बॉलिवूड सेलिब्रिटींसह क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गजांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केला आहे.

सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मा अशा भारतीय क्रिकेट जगतातील दिग्गजांसह मोहम्मद हफीज आणि दानिश कानेरिया सारख्या पाकिस्तानी खेळाडूंपर्यंत बऱ्याचजणांनी पहलगाम हल्ल्यातील मृतकांना श्रद्धांजली वाहिली आहे. अनेकजण या घटनेवर व्यक्त झाले आहेत. याच दरम्यान दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया न दिल्याने महेंद्रसिंह धोनी ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे.

२०११ मध्ये एमएस धोनीला भारतीय लष्करामध्ये लेफ्टनंट या पदाने सन्मानित करण्यात आले होते. 'सेनेमध्ये लेफ्टनंट असतानाही पहलगाम सारख्या महत्त्वपूर्ण घटनेवर काही पोस्ट केले आहे का?', असा सवाल एका यूजरने विचारला आहे. तर दुसऱ्या यूजरने 'मी सीएसकेचा फॅन होतो, पण धोनीने मुर्शिदाबाद आणि बांग्लादेशमध्ये घडलेल्या घटनांवर प्रतिक्रिया दिली नव्हती आता पहलगाम हल्ल्यावरही तो गप्प आहे', असे म्हटले आहे.

ऋतुराज गायकवाड दुखापतग्रस्त असल्याने चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्त्व एमएस धोनीकडे सोपवण्यात आले आहे. आज चेपॉकच्या स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद ही लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना जर सीएसकेने गमावला तर प्लेऑफमध्ये जाण्याचे त्यांचे आव्हान संपुष्टात येईल असा अंदाज वर्तवला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Protest: मासविक्री बंदीविरोधात खाटिक समाज आक्रमक, KDMC समोर कोंबड्या घेऊन आंदोलन; पाहा VIDEO

Janmashtami 2025 : जन्माष्टमीच्या दिवशी घरात या वस्तु ठेवल्यास येऊ शकते नकारात्मकता

Maharashtra Live Update: कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटात दरड कोसळली

Viral Video: कारला उडवलं नंतर पोलिसांना चकवा; भरधाव वेगात कॅब चालकाचा प्रवाशांच्या जिवाशी खेळ, Video व्हायरल

दाबा लोकशाहीचं बटण, दाबून खा चिकन-मटण, खाटिक समाज आणि काँग्रेसचे हातात कोंबड्या घेऊन निदर्शन | VIDEO

SCROLL FOR NEXT