Pahalgam Attack : पहलगामचा हल्ला माझ्याच देशाने घडवून आणला, पाकिस्तान क्रिकेटपटूने केली पोलखोल

Pahalgam Terror Attack : काश्मीरच्या पहलगाममध्ये मंगळवारी (२२ मार्च) दहशतवादी हल्ला झाला. हा हल्ला माझ्या देशाने, पाकिस्ताननेच घडवून आणल्याचा दावा पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने केला आहे.
Pahalgam Terror Attack
Pahalgam Terror AttackX
Published On

Pahalgam Terrorist Attack : काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामध्ये २८ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. गोळीबारामध्ये अनेकजण जखमी झाले. पहलगाम हल्ल्याचा जगभरातून तीव्र निषेध केला जात आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कानेरियाने या हल्ल्यावर संताप व्यक्त केला आहे. हा हल्ला पाकिस्तानने केल्याचा दावा कानेरियाने केला आहे.

पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांनी पहलगाम हल्ल्यात सहभागी झालेल्या दहशतवाद्यांना स्वातंत्र्यसैनिक असे संबोधले होते. त्यांच्या याच विधानाला जोडून दानिश कानेरियाने नवी पोस्ट शेअर केली आहे. 'पाकिस्तानचे उपपंतप्रधान स्वत: दहशतवाद्यांना स्वातंत्र्यसैनिक म्हणत आहेत. हे अपमानास्पदच आहेच पण आपल्याच देशाने हा हल्ला केला आहे हे मान्य करण्यासारखे आहे' असे दानिश कानेरियाने म्हटले आहे.

Pahalgam Terror Attack
IPL 2025 : मुंबई इंडियन्सने अंपायरला विकत घेतलं? 'या' ३ निर्णयांवरुन उपस्थित केली जातेय शंका

याआधीही दानिश कानेरियाने पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावर निशाणा साधला होता. 'जर पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा काही संबंध नसेल, तर पंतप्रधान शहबाज शरीफ अजूनही शांत का आहेत? या हल्ल्याचा त्यांनी निषेध का केला नाही? पाकिस्तानचे सैन्य हाय अलर्टवर का आहे?' असे कनेरियाने पोस्टमध्ये लिहिलेले होते.

Pahalgam Terror Attack
India vs Pakistan सामन्याचा चेंडू आता ICC कडे; बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं- आमच्या हातात नाही...

दानिश कानेरिया पाकिस्तान क्रिकेट संघातील मोजक्या हिंदू क्रिकेटपटूंपैकी एक होता. पाकिस्तानमध्ये हिंदू धर्मीय असल्याने आपल्यावर किती अत्याचार झाले याबद्दलची त्याने अनेकदा माहिती दिली आहे. स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे त्याच्यावर क्रिकेट बोर्डाने आजीवन बंदी घातली होती. सध्या तो कुटुंबासह अमेरिकेमध्ये वास्तव्याला आहे.

Pahalgam Terror Attack
Neeraj Chopra : माझ्या देशभक्तीवर प्रश्न करणाऱ्यांनो...! अर्शद नदीमवरुन ट्रोल करणाऱ्यांना नीरज चोप्राचं सडेतोड उत्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com