MS Dhoni Trolled x
Sports

MS Dhoni : चेन्नईचा पराभव, महेंद्रसिंह धोनी होतोय ट्रोल; नेटकरी म्हणाले, टुकूटुकू...

MS Dhoni Trolled : चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना चेन्नईने गमावला. घरच्या स्टेडियममध्ये सीएसकेचा पराभव झाला. या पराभवाचे खापर महेंद्रसिंह धोनीवर फोडले जात आहे.

Yash Shirke

MS Dhoni CSK VS DC : चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना चेपॉक स्टेडियममध्ये खेळला गेला. सामन्यात चेन्नईचा दारुण पराभव झाला. हा सामना जिंकत दिल्ली कॅपिटल्सने सलग तिसरा विजय मिळवला. फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्सचे शिलेदार सपशेल फसले. या पराभवाचे खापर प्रामुख्याने धोनीवर फोडल्याचे पाहायला मिळत आहे. योग्य वेळी धावा न केल्याने महेंद्रसिंह धोनीला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

रवींद्र जडेजा बाद झाल्यानंतर दहाव्या ओव्हरमध्ये महेंद्रसिंह धोनी फलंदाजी करण्यासाठी आला. त्याच्यासोबत मैदानामध्ये विजय शंकर होता. ज्या वेळेस धोनी मैदानात उतरला, १० चा रनरेट हवा होता. सामना चेन्नईच्या हातात होता. फटकेबाजी करण्याची वेळ असताना धोनीसह शंकरने देखील संयमी खेळी केली. त्यामुळे रनरेट वाढत गेला.

याशिवाय चेन्नईचे प्रमुख फलंदाज अपयशी ठरल्याने एमएस धोनी आणि विजय शंकर यांच्यावर दबाव आला. तरीही सामना चेन्नईच्या हातात असल्याचे म्हटले जात होते. पण दोघांनीही आक्रमक न खेळल्याने सामना सीएसकेच्या हातून सुटला. त्याच वेळी दिल्लीने देखील चांगला खेळ केला. चेन्नईकडून खेळताना विजय शंकरने सर्वाधिक ६९ धावा केल्या. तर महेंद्रसिंह धोनीने नाबाद ३० धावा केल्या. टूक टूक खेळल्याने चेन्नईचा पराजय झाल्याचे नेटकरी म्हणत आहेत.

प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने एकूण १८३ धावा केल्या. दुसऱ्या इनिंगमध्ये फलंदाजीसाठी आलेल्या चेन्नई सुपर किंग्सच्या संघाला दिल्लीने १५८ धावांवर रोखले. दिल्लीचा संघदेखील चेन्नईप्रमाणे फलंदाजीत काहीसा अपयशी ठरला होता. पण त्यांनी गोलंदाजीमध्ये कमबॅक केले आणि सामना जिंकला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाडक्या बहि‍णींसाठी खूशखबर; नागपुरातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गेमचेंजर घोषणा

नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती, कधी होणार मतदान?

Friday Horoscope : पैशांची चिंता मिटणार,लक्ष्मी प्रसन्न होणार; ५ राशींच्या लोकांसाठी शुक्रवार गेमचेंजर ठरणार

Pune Politics: आरोप सिद्ध नाही झाले तर राजकारण सोडा; मुरलीधर मोहोळ यांचे अजित पवारांना "ओपन चॅलेंज"

भारत-कंबोडिया ते व्हिएन्टिन, दररोज व्हायची मारहाण; किडनी विकलेल्या शेतकऱ्याने मांडली व्यथा, काँग्रेस मदतीला धावली

SCROLL FOR NEXT