MS Dhoni X
Sports

MS Dhoni : ना धड कॅप्टनसी, ना परफॉर्मन्स; तरीही थाला पुढची IPL खेळणार, जवळच्या व्यक्तीने दिली माहिती

MS Dhoni CSK : आयपीएल २०२५ मध्ये चेन्नई सुपर किंग्सचा खराब फॉर्म सुरु आहे. त्यामुळे त्यांनी आत्ताच पुढच्या सीझनची तयारी सुरु केल्याचे म्हटले जात आहे. अशाच धोनी आयपीएल २०२६ मध्ये खेळणार की नाही या प्रश्नाचे उत्तर समोर आले आहे.

Yash Shirke

चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतग्रस्त झाल्याने एमएस धोनीकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. गायकवाडच्या नेतृत्त्वात सीएसकेचा संघ संघर्ष करत होता. धोनीकडे नेतृत्त्व गेल्याने आता तरी चेन्नईचा खेळ सुधारेल अशी आशा व्यक्त केली जात होती. पण त्यांचा खेळ आणखीनच बिघडत गेला. आता चेन्नई प्लेऑफच्या स्पर्धेतून जवळजवळ बाहेर पडला आहे.

आयपीएल २०२५ मध्ये चेन्नईप्रमाणे महेंद्रसिंह धोनीनेही वाईट कामगिरी केली आहे. तेव्हा माहीच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. धोनी यापुढे दिसणार की नाही अशाही चर्चा रंगल्या आहेत. चर्चा सुरु असतानाच चेन्नई संघातील एका माजी खेळाडूने धोनी पुढच्या एका आयपीएल सीझनमध्ये खेळतान दिसेल असे वक्तव्य केले आहे.

मिस्टर आयपीएल अशी ओळख असलेल्या सुरेश रैनाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रैना टीव्ही होस्ट जतीन सप्रूशी गप्पा मारत असल्याचे दिसते. चेन्नई सुपर किंग्सच्या आयपीएल २०२५ मधील कामगिरीवर ते दोघे चर्चा करत असल्याचे दिसते. तेव्हा रैना म्हणतो, 'मला आशा आहे की पुढच्या सीझनमध्ये ते (चेन्नईचा संघ) चांगले नियोजन करतील. आणि धोनी नक्कीच आणखी एक सीझन खेळेल.'

'चेन्नई संघाचे सीईओ सर्व कामे पाहतात. ऑक्शनच्या वेळेस एमएस धोनीला फोन यायचा, पण तो ऑक्शनशी संबंधित निर्णयात फारसा सहभागी नसायचा. धोनी फक्त त्याच्या महत्त्वपूर्ण वाटणाऱ्या ४ ते ५ खेळाडूंची नावे सांगतो. नेहमीप्रमाणे यंदाही संघ व्यवस्थापनाने संघाचा कोअर ग्रुप निवडला. धोनी लिलावात सहभागी नव्हता. तो असा लिलाव, अशी निवड करु शकत नाही', असेही सुरेश रैनाने म्हटले.

आयपीएल २०२५ च्या पॉईंट्स टेबलवर चेन्नईचा संघ सध्या १० व्या स्थानी आहे. ९ पैकी ७ सामने त्यांनी गमावले आहेत. सीएसकेसाठी हा आतापर्यंतचा सर्वात वाईट सीझन ठरला आहे. घरच्या मैदानात अनेक संघांकडून त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. १७ वर्षांनी बंगळुरू, १० वर्षांनी दिल्ली आणि १८ वर्षांनी हैदराबादने चेन्नईला पराभूत केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra School: पहिलीच्या वेळापत्रकातून हिंदी हद्दपार, सुधारित वेळापत्रक जाहीर

Shukrawar che Upay: शुक्रवारच्या दिवशी 'या' चमत्कारी उपायांनी नशीब उजळेल; करियर-कुटुंबातील अडखळे होतील दूर

Indore Street Food: फक्त पोहेच नाही, इंदूरची 'हे' स्ट्रीट डिशेस देखील आहेत अव्वल दर्जाचे

Maharashtra Live News Update: विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत जाऊन पोहोचली

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

SCROLL FOR NEXT