नाशिकमध्ये 300 कोटींचा भूखंड घोटाळा, 49 बिल्डरांविरोधात गुन्हा दाखल

₹300 Crore Plot Scam Rocks Nashik: आता बातमी आहे ३०० कोटींच्या भूखंड घोटाळ्याची.... नाशिकमध्ये म्हाडाच्या घरांच्या कोट्याबाबत भूखंड घोटाळा उघडकीस आलाय. याप्रकरणी 49 बिल्डरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या बिल्डरांनी शासनाची कशी फसवणूक केली? बिल्डरांना मदत करणा-या अधिका-यांना कोण वाचवतंय ? पाहूया या रिपोर्टमधून...
Investigation underway in Nashik after a ₹300 crore MHADA housing land scam surfaced, with police filing cases against 49 builders for alleged fraud
Investigation underway in Nashik after a ₹300 crore MHADA housing land scam surfaced, with police filing cases against 49 builders for alleged fraudSaam Tv
Published On

नाशिकमध्ये तब्बल 300 कोटींचा भूखंड घोटाळा झाल्याचं उघडकीस आलंय..आणि हा घोटाळा झालाय म्हाडाच्या घर योजनेत..या योजनेतल्या बांधकाम व्यावसायिकांनी योजनेतल्या पळवाटा शोधत भूखंडाचं श्रीखंड खाल्लयं. काय आहे हे नेमकं प्रकरण पाहूयात..

चार हजार चौरस मीटर प्रकल्पांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 20 टक्के घरे राखीव ठेवणे बंधनकारक होतं. मात्र हा राखीव कोटा टाळण्यासाठी काही बिल्डरांनी प्रकल्पातील जागेचे बनावट विभाजन केलं तर काहींनी लहान गाळे दाखवून प्रकल्पाचा आकार कमी दाखवला तर काहींनी भूखंडांचे विभाजन करून नियमांनाच बगल दिली. जेव्हा या प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी केली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला आणि 49 बिल्डरांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.

घोटाळा नेमका कसा झालाय ते पाहूया...

चार हजार चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्र असल्यान त्याचं विभाजन करण्यात आलं.

शहरातील म्हसरूळ, वडनेर दुमाला, देवळाली, आडगाव, आगरटाकळी, विहीतगांव, नाशिक, नांदूर दसक, पंचक, गंगापूर, चेहडी इथल्या 108 प्रकरणांची तपासणी तहसिलदारांनी केली.

या प्रकरणांची भूमि अभिलेख आणि नगर भूमापन अधिकारी यांच्या कार्यालयाकडूनही पडताळणी करण्यात आली.

यात एकूण 49 प्रकरणांमध्ये पोटहिस्सा मोजणी झालेली नसताना तशी मोजणी झाल्याचे भासवत बनावट मोजणी नकाशे तहसिल कार्यालयाकडे जमा करण्यात आले.

या घोटाळ्यात भ्रष्ट अधिकारी-कर्मचारी आणि बिल्डर्स यांची युती झाल्याशिवाय सरकारी नियमांची ऐशीतैशी करणं शक्य नव्हतं. त्यामुळे कायदा धाब्यावर बसवणा-या बिल्डरांविरुद्ध जरी गुन्हा दाखल झालेला असला तरी प्रशासनातील अधिका-यांना कोण वाचवतंय ? हा प्रश्न उरतोच.त्यामुळे धनदांडग्यांशी मिलीभगत करुन शासनाची फसवणूक करणा-या अधिका-यांवरही कधी कारवाई होते ? ते पाहणं महत्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com