IPL 2025 चा ३० वा सामना एकाना स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे दोन संघ आमनेसामने आले आहेत. सामन्यामध्ये टॉस जिंकून चेन्नईने प्रथम गोलंदाजी केली. तर लखनऊने २० ओव्हर्समध्ये १६६ धावा केल्या. सामन्याच्या दरम्यान डीआरएस म्हणजेच धोनी रिव्ह्यू सिस्टीम पुन्हा एकदा चर्चा पाहायला मिळाली.
चौथ्या ओव्हरमध्ये अंशुल कम्बोज गोलंदाजी करण्यासाठी आला. ओव्हरच्या शेवटच्या बॉलच्या वेळेस निकोलस पूरन स्ट्राइकवर होता. तेव्हा पूरनच्या विरोधात एलबीडब्लूची अपील केली. ग्राउंड अंपायर्सनी थोडा वेळ घेतला आणि निकोलस पूरनला नॉटआउट घोषित केले. कम्बोजवर विश्वास दाखवत महेंद्रसिंह धोनीने डीआरएस घेण्याचा इशारा दिला.
महेंद्रसिंह धोनीने डीआरएसची मागणी केल्यानंतर रिव्ह्यू समोर आला. त्यानंतर कॅमेऱ्यामध्ये बॉल लेग स्टंपला लागल्याचे पाहायला मिळाले. ऑरेंज कॅप असलेला निकोलस पूरन फक्त ८ धावांवर बाद झाला आणि पुन्हा एकदा महेंद्रसिंह धोनीच्या रिव्ह्यूची चर्चा सुरु झाली. धोनीने आयुष बडोनीला देखील स्टंप आउट केले.
आजच्या सामन्यात धोनीने स्टंप्सच्या मागून चांगली कामगिरी केली. एमएस धोनी आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी विकेटकिपर आहे. २७१ सामन्यामध्ये धोनीने तब्बल १९५ फलंदाजांना बाद केले आहे. यात १५० कॅच आणि ४५ स्टंपिंग्सचा समावेश आहे.
लखनऊ सुपर जायंट्सची प्लेईंन ११ -
रिषभ पंत (कर्णधार), एडन मारक्रम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समाद, शार्दुल ठाकूर, दिग्वेश राठी, आकाश दीप, आवेश खान.
चेन्नई सुपर किंग्सची प्लेईंग ११ -
एमएस धोनी (कर्णधार), शेख रशीद, रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, विजय शंकर, जेमी ओवर्टन, रवींद्र जडेजा, खलील अहमद, नूर अहमद, अंशुल कम्बोज, मथीश पाथिराना.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.