LSG VS CSK : What a Catch...! मागच्या दिशेने धावत राहुल त्रिपाठीने घेतला भन्नाट कॅच; VIDEO व्हायरल

LSG VS CSK IPL 2025 : लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या सामन्यामध्ये राहुल त्रिपाठीने घेतलेल्या उत्कृष्ट कॅचची चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. राहुलने घेतलेल्या कॅचमुळे आक्रमक खेळी करणारा एडन मारक्रम लवकर माघारी परतला.
LSG VS CSK IPL 2025 Rahul Tripathi
LSG VS CSK IPL 2025 Rahul TripathiX
Published On

लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या सामन्यामध्ये एमएस धोनीने टॉस जिंकला आणि पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लखनऊचे सलामीवीर एडन मारक्रम आणि मिचेल मार्श फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरले. या सामन्याच्या सुरुवातीलाच आक्रमक एडन मारक्रमला बाद केले.

चेन्नईकडून खेळताना खलील अहमद गोलंदाजी करायला आला. ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर एडन मारक्रम स्ट्राइकवर होता. खलीलने टाकलेल्या हार्ड लेंथ बॉलवर मारक्रनने जोरदार शॉट मारला. बॉल पकडण्यासाठी राहुल त्रिपाठी उलटा धावत-धावत मागे गेला आणि त्याने झेप घेत अवघड कॅच पकडला. त्याच्या या प्रयत्नांमुळे एडन मारक्रम फक्त ६ धावा करुन माघारी परतला. राहुल त्रिपाठीने घेतलेल्या या कॅचचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

LSG VS CSK IPL 2025 Rahul Tripathi
DC VS MI IPL 2025 : रोहितलाच क्रेडिट का? हरलो असतो तर शिव्या मात्र एकट्या हार्दिकला दिल्या असत्या! - संजय मांजरेकर

दरम्यान एडन मारक्रम बाद झाल्याने मिचेल मार्शने निकोलस पूरनसोबत खेळ पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पण निकोलस पूरन देखील मारक्रमप्रमाणे लवकर बाद होऊन माघारी परतला. त्याने फक्त ८ धावा केल्या. मिचेल मार्श ३० धावांवर बाद झाल्याने रिषभ पंत-आयुष बडोनी यांनी मोर्चा सांभाळला. चुकीचा शॉट मारण्याच्या नादात बडोनी आउट झाला. त्याने २२ धावा केल्या.

LSG VS CSK IPL 2025 Rahul Tripathi
Tilak Varma : मला Retired Out केलं, कारण... मुंबई इंडियन्सच्या 'त्या' निर्णयावर तिलक वर्मानं सोडलं मौन

लखनऊ सुपर जायंट्सची प्लेईंन ११ -

रिषभ पंत (कर्णधार), एडन मारक्रम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समाद, शार्दुल ठाकूर, दिग्वेश राठी, आकाश दीप, आवेश खान.

चेन्नई सुपर किंग्सची प्लेईंग ११ -

एमएस धोनी (कर्णधार), शेख रशीद, रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, विजय शंकर, जेमी ओवर्टन, रवींद्र जडेजा, खलील अहमद, नूर अहमद, अंशुल कम्बोज, मथीश पाथिराना.

LSG VS CSK IPL 2025 Rahul Tripathi
DC VS MI : तिकीट का पैसा वसूल! चालू सामन्यात चाहत्यांमध्ये तुफान राडा, एकटी महिला अख्ख्यांना पुरून उरली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com