
एकाना स्टेडियमवर लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स हा सामना रंगला आहे. या सामन्यात एक रंजक प्रसंग पाहायला मिळाला. लखनऊचा फलंदाज आयुष बडोनी मथीशा पथिरानाच्या बाऊन्सर आउट झाला. विजय शंकरने त्याची कॅच पकडली. तरीही अंपायर्सनी बडोनीला नॉट आउट असल्याचे घोषित केले.
१३ व्या ओव्हरमध्ये मथीशा पथिराना गोलंदाजी करायला आला. त्याच्या ओव्हरमध्ये पथिरानाने टाकलेल्या बॉलवर बडोनीने अपर कट मारला आणि थर्ड मॅनवर असेल्या विजय शंकरने त्याची कॅच पकडली. पण बॉल आयुष बडोनीच्या खांद्याच्या वरुन गेल्याने नो बॉल झाल्याचे म्हटले आणि कॅचआउट झालेला बडोनी नॉट आउट झाला.
नो बॉलनंतर आयुष बडोनीला फ्री हिट मिळाली. त्यावर त्याने फक्त १ धाव काढली. पुढे रवींद्र जडेजाच्या ओव्हरमध्ये बडोनी एलबीडब्लूने आउट झाला. पण डीआरएश घेतल्यानंतर बॉल बडोनीच्या ग्लोव्हजवर आधी लागल्याचे स्पष्ट झाले. बॉल ग्लोव्हजला लागल्याने बडोनीला दुसरे जीवनदान मिळाले. त्याच ओव्हरमध्ये रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिंह धोनी यांनी मिळून आयुष बडोनीला स्टंप आउट केले.
प्रथम फलंदाजी करताना लखनऊच्या संघाने १६६ धावा केल्या. सलामीला आलेला एडन मारक्रम आणि निकोलस पूरन धावा करण्यात फेल झाले. पुढे रिषभ पंतने खेळ सावरला. शेवटच्या ओव्हरपर्यंत खेळताना कॅप्टन रिषभ पंतने सर्वाधिक ६३ धावा केल्या. मिचेल मार्शने ३०, आयुष बडोनीने २० आणि अब्दुल समादने २२ धावा केल्या.
लखनऊ सुपर जायंट्सची प्लेईंन ११ -
रिषभ पंत (कर्णधार), एडन मारक्रम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समाद, शार्दुल ठाकूर, दिग्वेश राठी, आकाश दीप, आवेश खान
चेन्नई सुपर किंग्सची प्लेईंग ११ -
एमएस धोनी (कर्णधार), शेख रशीद, रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, विजय शंकर, जेमी ओवर्टन, रवींद्र जडेजा, खलील अहमद, नूर अहमद, अंशुल कम्बोज, मथीश पाथिराना
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.