MS Dhoni Retirement x
Sports

MS Dhoni : चेन्नईत मॅच, स्टेडियममध्ये आई-वडील, अन् जडेजाची ती स्टोरी... धोनी रिटायरमेंट घोषित करणार? जोरदार चर्चा

MS Dhoni Retirement : एमए चिदंबरम स्टेडियममध्ये आज चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना रंगला आहे. एमएस धोनी आज आयपीएलमधून निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर चर्चा सुरु आहेत.

Yash Shirke

MS Dhoni CSK IPL 2025 : चेपॉक स्टेडियमध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना सुरु झाला आहे. आयपीएल २०२५ मधील हा शनिवारच्या डबल हेडरचा पहिला सामना आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने टॉस जिंकला आणि पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्यादरम्यान एमएस धोनी आज रिटायरमेंट घेणार अशा सोशल मीडियावर चर्चा रंगल्या आहेत.

चेन्नई विरुद्ध दिल्लीचा सामना पाहण्यासाठी आज एमएस धोनीची पत्नी साक्षी धोनी चेपॉक स्टेडियमला पोहोचली आहे. तिच्यासह माहीचे आई-वडील देखील आले असल्याचे म्हटले जात आहे. त्याच दरम्यान एमएस धोनी आजच्या सामन्यादरम्यान निवृत्त होणार असल्याच्या सोशल मीडियावर चर्चा रंगल्या आहेत.

फलंदाजीसाठी खालच्या क्रमावर आल्याने एमएस धोनीला ट्रोल करण्यात आले होते. त्यानंतर धोनीला १० ओव्हर्स फलंदाजी करणे शक्य नसल्याचे चेन्नई सुपर किंग्सच्या मुख्य प्रशिक्षकांनी माध्यमांसमोर सांगितले होते. धोनीचा खराब फॉर्म सुरु असल्याने तो निवृत्त होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. रवींद्र जडेजाने शेअर केलेल्या स्टोरीमुळेदेखील धोनी रिटायरमेंट घेणार का? असे नेटकरी म्हणत होते. याशिवाय ऋतुराज गायकवाडच्या ऐवजी आज धोनी कर्णधारपद सांभाळणार असल्याचेही म्हटले जात होते. त्यामुळे आज पुन्हा धोनीची निवृत्ती हा चर्चेचा विषय बनला आहे.

एमएस धोनीच्या नेतृत्त्वामध्ये चेन्नई सुपर किंग्सने ५ वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे. २००८ पासून २०२३ पर्यंत तो चेन्नईचा कर्णधार होता. २०२४ मध्ये चेन्नई सुपर किंग्सद्वारे कर्णधारपदाची जबाबदारी युवा ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आली. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो फक्त आयपीएल खेळतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक जिल्ह्यात घेणार तीन प्रचार सभा

Local Body Election : मोठी बातमी! बारामतीमध्ये २ प्रभागांच्या निवडणुका लांबणीवर, कारण काय?

School Closed: मोठी बातमी! ५ डिसेंबरला राज्यातील सर्व शाळा बंद राहण्याची शक्यता; कारण काय?

PF Balance Check: UAN नंबरशिवायही चेक करता येईल बॅलन्स, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Hair Wash: विवाहित महिलांनी या ३ दिवशी चुकूनही केस धुवू नये? नाहीतर...

SCROLL FOR NEXT