MS Dhoni  saam tv
Sports

MS Dhoni Retirement: एमएस धोनी IPL 2023 नंतर निवृत्त होणार का? CSK च्या CEO ने दिली मोठी अपडेट

MS Dhoni IPL: आता चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या सीईओने धोनीच्या खेळण्याबाबत मोठी माहिती दिली आहे.

Ankush Dhavre

MS Dhoni: आयपीएल २०२३ स्पर्धेत पार रविवारी चेन्नई सुपर किंग्ज विरुध्द कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. हा सामना चेन्नईचे फॅन्स कधीच विसरू शकणार नाहीत.

कारण हा सामना एमएस धोनीचा चेपॉकच्या मैदानावरील शेवटचा सामना असू शकतो. या खास सामन्यात चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र निराश झालेल्या चाहत्यांना धोनीने गिफ्ट्स आणि जर्सी देऊन खुश केले.

त्याचे हे शेवटचे हंगाम असू शकतं अशा चर्चा सुरु असताना आता चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या सीईओने धोनीच्या खेळण्याबाबत मोठी माहिती दिली आहे.

आयपीएल २०२३ स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच अशी चर्चा सुरु आहे की, हा हंगाम एमएस धोनीचा शेवटचा हंगाम असू शकतो. आता चेन्नई सुपर किंग्ज संघाचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी एमएस धोनीच्या निवृत्तीबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

टाइम्स नावला दिलेल्या माहितीत काशी विश्वनाथन यांनी म्हटले की, 'आम्हाला असं वाटतं की, धोनी येणाऱ्या हंगामातही खेळू शकतो. आम्ही अशी आशा करतो की, चाहते आम्हाला असंच समर्थन करत राहतील.' यावरून असा अंदाज व्यक्त केला जात आहे की,धोनी आगामी हंगामातही खेळताना दिसून येऊ शकतो.

दुखापतग्रस्त असुनही उतरला मैदानात...

एमएस धोनी या सामन्यात दुखापतग्रस्त असुनही मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले होते. त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. हेच कारण आहे की, तो उशीरा फलंदाजी करण्यासाठी आला होता.

कोलकता नाईट रायडर्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यानंतर जेव्हा चेन्नईचा संघ चाहत्यांचे अभिवादन करत होता, त्यावेळी धोनीच्या गुडघ्यावर आईसपॅक असल्याचे दिसून आले होते. (Latest sports updates)

धोनी नंतर कोण होणार चेन्नईचा कर्णधार?

एमएस धोनी चेन्नई सुपर किंग्ज संघाची साथ न सोडण्याचं कारण हे ही असू शकतं की, धोनीनंतर चेन्नईचे नेतृत्व कोण करणार हे स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये. धोनीच्या नेतृत्वखाली खेळताना चेन्नईचा संघ जोरदार कामगिरी करतोय.

ज्यावेळी बेन स्टोक्सला मोठी बोली लावून संघात स्थान दिलं गेलं होतं त्यावेळी अशी चर्चा रंगली होती की, धोनीनंतर बेन स्टोक्स चेन्नईचा पुढील कर्णधार होऊ शकतो. मात्र तो दुखापतीमुळे सतत संघाबाहेर होतोय.

हे पाहता अजिंक्य रहाणेकडे ही जबाबदारी सोपवली जाऊ शकते. कारण अजिंक्य रहाणेला नेतृत्व करण्याचा अनुभव आहे. त्याने अनेकदा भारतीय संघाचे देखील नेतृत्व केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati Police : अवैध हुक्का पार्लरवर पोलिसांची धाड; एमडी, गांजा, विदेशी मद्य जप्त

Maharashtra Live News Update: निवडणूक आयोगाविरोधात ३०० खासदार एकवटले; इंडिया आघाडीचं आंदोलन

Sambhajinagar News : संभाजीनगरात फसवणुकीचा नवा फंडा, सोन्यात मिक्स केली चांदी, रीलस्टार अडचणीत

'माजी उपराष्ट्रपतींना नजर कैदेत ठेवलंय, ते सुरक्षित नाहीत'; बड्या खासदाराचं अमित शहांना पत्र, राजकीय वर्तुळात खळबळ

Today Gold Rate: रक्षाबंधनानंतर सोन्याचे दर ७६०० रुपयांनी घसरले; १० तोळ्याचा आजचा भाव किती?

SCROLL FOR NEXT