MS Dhoni hits Mumbai player saam tv
Sports

MS Dhoni: एमएस धोनी ने Live सामन्यात मुंबईच्या 'या' खेळाडूला बॅटने मारलं; CSK च्या विजयानंतर होतोय Video व्हायरल, पाहा काय आहे नेमकं प्रकरण?

MS Dhoni hits Mumbai player : माजी कर्णधार एमएस धोनीने स्टम्पिंगमधील अफलातून कौशल्याने सीएसकेच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. मात्र, या सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. तरीसुद्धा, धोनीने त्याच्या बॅटचा वापर केला, आणि तोही थेट मुंबई इंडियन्सच्या एका खेळाडूवर! सध्या धोनीच्या या कृतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Surabhi Jayashree Jagdish

रविवारी चेपॉकच्या मैदानावर आयपीएलमधील एल-क्लासिको खेळवण्यात आली. मुंबई इंडियन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्जच्या यांच्यामध्ये अखेर यलो आमीने बाजी मारली. चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांसाठी आयपीएल २०२५ ची सुरुवात यापेक्षा चांगली होऊ शकली नसती. मुंबई इंडियन्सविरुद्धचा हा सामना चेन्नईच्या टीमने अगदी सहज जिंकला.

टीमचा माजी कर्णधार एमएस धोनीने स्टम्पिंगमध्ये जादू दाखवल्याने हा विजय आणखी खास झाला. दरम्यान या सामन्यात धोनीला फलंदाजीमध्ये कामगिरी कऱण्याची संधी मिळाली नाही. मात्र तरीही त्याने बॅटचा वापर नक्कीच केला, तोही मुंबई इंडियन्सच्या एका खेळाडूवर. सध्या धोनीच्या या कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

चेपॉकमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात चेन्नईने मुंबईचा ४ विकेट्स राखून पराभव केला. या सामन्यात धोनीने त्याच्या विकेटकीपिंगने मुंबईला सर्वात मोठी विकेट मिळवून दिली. कर्णधार सूर्यकुमार यादवला स्टंपिंग करून मुंबईला धक्का दिला. तर सीएसकेची फलंदाजी सुरु असताना १९ व्या ओव्हरमध्ये धोनी फलंदाजीसाठी आला तेव्हा स्टेडियममध्ये चाहत्यांनी गोंगाट सुरु केला.

धोनीने दीपक चाहरला बॅटने मारलं

२० व्या म्हणजेच शेवटच्या ओव्हरमध्ये रचिन रवींद्रने विनिंग शॉट लगावला. चेन्नईच्या विजयानंतर दोन्ही टीमच्या खेळाडूंनी एकमेकांशी हँडशेक केलं. यावेळी धोनी मुंबईच्या खेळाडूंशी बोलत होता आणि त्यांच्याशी हात मिळवत होता. यावेळी मुंबई इंडियन्सचा गोलंदाज दीपक चहर त्याच्यासमोर आला. चहरने धोनीला काहीतरी सांगितलं आणि धोनीने लगेच त्याची बॅट उचलली आणि गमतीने त्याच्या कमरेवर. दरम्यान धोनीचा हा अंदाज चाहत्यांना फारच आवडला आहे.

दीपक चहर सलग ७ सिझनमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा भाग होता. या कालावधीमध्ये त्याने धोनीच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी केलीये. धोनीसोबतची त्याची मैत्री खूप खास आहे, जी मैदानावर आणि मैदानाबाहेर अनेक वेळा दिसून आलीये. तो अनेकदा धोनीसोबत मजा-मस्ती करताना दिसलाय.

चेपॉकच्या मैदानावरही असंच काहीसं घडलेलं दिसलं. याठिकाणी धोनीने मुंबईमध्ये आलेल्या चहरला मजेदार पद्धतीने बॅटने मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी चहरनेही स्वतःला वाचवण्यासाठी उडी मारली. दोघांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला असून चाहत्यांना तो प्रचंड आवडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

SCROLL FOR NEXT