MS dhoni creates record in ipl becomes the only wicketkeeper to took 150 catches in ipl history amd2000 twitter
Sports

MS Dhoni Record: वयाच्या ४२ व्या वर्षी धोनीचा मोठा कारनामा! IPL मध्ये असा रेकॉर्ड करणारा ठरला पहिलाच यष्टीरक्षक

Most Catches In IPL: पंजाबविरुद्धच्या सामन्यात धोनीने मोठा कारनामा करुन दाखवला आहे. असा रेकॉर्ड करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे.

Ankush Dhavre

पंजाब किंग्जविरुद्ध झालेल्या सामन्यात एमएस धोनी पहिल्याच चेंडूवर त्रिफळाचित होऊन माघारी परतला. मात्र वयाच्या ४२ व्या वर्षी त्याच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. धोनीने आयपीएल स्पर्धेत १५० झेल टिपण्याचा पराक्रम केला आहे. असा कारनामा करणारा तो जगातील पहिलाच यष्टिरक्षक ठरला आहे. आजवर कुठल्याच यष्टिरक्षकाला असा कारनामा करता आला नव्हता. दरम्यान धोनीने हा कारनामा वयाच्या ४२ व्या वर्षी करून दाखवला आहे.

एमएस धोनी हा या स्पर्धेतील सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. तो या स्पर्धेच्या पहिल्या हंगामापासून खेळतोय. त्याने या स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज आणि रायझिंग पुणे सुपर जायंट्स संघाचं नेतृत्व केलं आहे. त्याला या स्पर्धेत२६१ सामने खेळण्याचा अनुभव आहे. यादरम्यान त्याने १५० झेल टिपले आहेत. तर ४२ फलंदाजांना यष्टीचीत करत माघारी धाडलं आहे. यासह त्याने एकूण १९२ फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखवली आहे.

आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक झेल टिपण्याच्या बाबतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील यष्टिरक्षक दिनेश कार्तिक दुसऱ्या स्त्यानी आहे. दिनेश कार्तिकने २४५ सामने खेळून १४२ गडी बाद केले आहेत. यादरम्यान ३६ फलंदाजांना त्याने त्रिफळाचित केलं.

हा कारनामा त्याने पंजाब किंग्जविरुध्दच्या सामन्यात करून दाखवला आहे. त्याने जितेश शर्माचा झेल टिपला आणि हा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या

पंजाब किंग्ज संघाने २० षटक अखेर ९ गडी बाद १६७ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पंजाब किंग्ज संघाला २० षटकअखेर अवघ्या ९ गडी बाद १३९ धावा करता आल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Missing Link Project : मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ आणखी कमी होणार; 'मिसिंग लिंक' प्रकल्प गेम चेंजर ठरणार, काय आहेत वैशिष्ट्ये?

Maharashtra Live News Update : शासकीय अधिकारी आणि शिवप्रेमींनी किल्ले रायगडावर साजरा केला जल्लोष

Singrauli News: म्हैस चक्क घराच्या छतावर चढली|VIDEO

Beed Crime : बीडमध्ये भयंकर घडलं! उसने दिलेले पैसे मागितल्याने महिलेला बेदम मारहाण

Multibagger stock : देनेवाला जब भी देता...! वर्षभरात एका लाखाचे झाले 8,400,000 रुपये; १०० रुपयांच्या शेअरने केली कमाल

SCROLL FOR NEXT