IPL 2024: गुटख्याच्या पुडीने नाणेफेकचा सराव करावा! १० वेळा टॉस गमवणाऱ्या ऋतुराजची दिग्गज माजी क्रिकेटरने घेतली फिरकी

IPL 2024 Ruturaj Gaikwad: नाणेफेकसाठी ऋतुराज गायकवाडने आता गुटख्याच्या पुडीचा उपयोग करावा असा सल्ला वसीम जाफरने त्याची फिरकी घेताना दिला. ऋतुराजने ११ सामन्यात १० वेळा नाणेफेक गमावलीय. तर पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात ऋतुराज गायकवाडने सलग ५व्यांदा नाणेफेक गमावलीय.
IPL 2024  Ruturaj Gaikwad toss
IPL 2024 Ruturaj Gaikwad toss x ipl

माजी भारतीय क्रिकेटपटू समालोचक वसीम जाफरने चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाडची पिरकी घेतलीय. रविवारी इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई आणि लखनऊ सुपर जायंट्सचा सामना झाला त्यात ऋतुराज पुन्हा एकदा नाणेफेक हरला. त्याने ११ सामन्यांत १० वेळा नाणेफेक गमावलीय. त्यावरून जाफरने त्याची फिरकी घेतली.

नाणेफेकसाठी ऋतुराज गायकवाडने आता गुटख्याच्या पुडीचा उपयोग करावा असा सल्ला वसीम जाफरने त्याची फिरकी घेताना दिला. ऋतुराजने ११ सामन्यात १० वेळा नाणेफेक गमावलीय. तर पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात ऋतुराज गायकवाडने सलग ५व्यांदा नाणेफेक गमावलीय. त्यावरुन वसीम जाफरने त्याची फिरकी घेतलीय.

सोशल मीडियाच्या 'एक्स' या प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केलीय. त्यात जाफरने गायकवाडची फिरकी घेतली. या पुढे नाणेफेक करताना ऋतुराजने नाण्यावर विश्वास न ठेवता थेट हिंदी-इंग्रजी असे पर्याय निवडत नाणेफेक करावी. गायकवाड नाणेफेक १० वेळा जरी हरला असेल तरी तो ५ वेळा सामने जिंकलाय त्यामुळे ते ठीक अशा आशयाची पोस्ट जाफरने केली होती. दरम्यान मागील एका सामन्यानंतर जाफर याने सांगितलं होतं की, सरावादरम्यानही ऋतुराज नाणेफेकचाही सराव करतो. तरीही तो नाणेफेक जिंकत नाहीये, सामन्यात नाणेफेक करताना ऋतुराज गायकवाड चिंतेत असतो, त्यामुळे तो नाणेफेक जिंकत नाही, असंही जाफर म्हणाला.

ऋतुराजची कामगिरी

यंदाच्या आयपीएल मोसमात गायकवाड नाणेफेक गमावत असला तरी तो सामने जिंकत आहे. त्या सामन्यामध्ये त्याने चांगली कामगिरी केलीय. पंजाबविरुद्ध खेळताना ऋतुराजने ४ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने २१ चेंडूत ३२ धावा केल्या. या धावा केल्यानंतर ऋतुराजने आयपीएलच्या करिअरमध्ये सचिन तेंडुलकरला पिछाडलंय. ऋतुराज गायकवाडने ६३ सामन्यात १३८.०१ च्या स्ट्रइक रेट आणि ४२.५० च्या सरासरीने २३३८ धावा केल्या. तो आयपीएलच्या इतिहासात ४५ वा सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज बनलाय.

IPL 2024  Ruturaj Gaikwad toss
IPL 2024 : जडेजाच्या ऑलराउंडर खेळीने पंजाबचं प्लेऑफचं स्वप्न भंगलं; Points Table मध्ये CSKची टॉप-३ मध्ये एंट्री

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com