ms dhoni head coach saam tv
क्रीडा

Team India Head Coach: एमएस धोनी टीम इंडियाचा हेड कोच बनू शकत नाही,अर्जही फेटाळला जाईल; वाचा कारण

Ms Dhoni, Team India Head Coach: बीसीसीआयने भारतीय संघासाठी मुख्य प्रशिक्षकाचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. मात्र एमएस धोनी भारतीय संघाचा हेड कोच का होऊ शकत नाही, जाणून घ्या.

Ankush Dhavre

राहुल द्रविड यांचा भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला आहे. आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा ही मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड यांची शेवटची स्पर्धा असणार आहे. ही जागा भरून काढण्यासाठी बीसीसीआयने १३ मे रोजी मुख्य प्रशिक्षकासाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. हे अर्ज भरण्याची शेवटची तारीख २७ मे होती. या पदासाठी गौतम गंभीरचं नाव आघाडीवर आहे. मात्र काही फॅन्सला वाटतंय की, ही जबाबदारी एमएस धोनीने स्विकारावी. मात्र धोनी भारताचा मुख्य प्रशिक्षक होऊ शकत नाही. काय यामागचं कारण? जाणून घ्या.

एमएस धोनी मुख्य प्रशिक्षक का होऊ शकत नाही?

कुठलाही खेळाडू मुख्य प्रशिक्षक पदासाठी तेव्हाच अर्ज करू शकतो जेव्हा तो कुठल्याही प्रकारचं क्रिकेट खेळत नसेल. एमएस धोनी आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळतोय. धोनीने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप घेतला, मात्र आयपीएल खेळत असल्याने त्याला मुख्य प्रशिक्षकासाठी अर्ज करता येणार नाही. जो खेळाडू भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करतो, तो खेळाडू कुठल्याही प्रकारचं प्रोफेशनल क्रिकेट खेळू शकत नाही. यापूर्वी २०२१ मध्ये झालेल्या टी -२० वर्ल्डकप स्पर्धेत एमएस धोनीने मेंटॉरची भूमिका बजावली होती. मात्र ही जबाबदारी पार पाडण्यासाठी त्याने कुठलंही मानधन घेतलं नव्हतं.

आयपीएल २०२३ स्पर्धा झाल्यानंतर एमएस धोनी आयपीएलमधून निवृत्त होणार अशी चर्चा सुरु होती, मात्र त्याने पुढील हंगाम खेळणार असं सांगितलं होतं. त्यानंतर त्याने आयपीएल २०२४ स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळीही असं वाटलं होतं की, हे धोनीचं शेवटचं हंगाम असेल. मात्र त्याने निवृत्तीचे कुठलेही संकेत दिलेले नाही. आयपीएल २०२४ स्पर्धेतील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने १४ सामन्यातील ११ डावात ५३.६७ च्या सरासरीने १६१ धावा केल्या. त्याने या हंगामातही शेवटच्या षटकांमध्ये फलंदाजीला येऊन तुफान फटकेबाजी केली.

कोण होणार मुख्यप्रशिक्षक?

बीसीसीआयने १३ मे पासून अर्ज मागवायला सुरुवात केली होती. हे अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २७ मे होती. दरम्यान या पदासाठी ३००० हून अधिक अर्ज आले आहेत. ज्यात एमएस धोनी, सचिन तेंडुलकर, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या बनावटी अर्जांचा देखील समावेश होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shukra Gochar 2024: नोव्हेंबर अखेरीस शुक्राचं नक्षत्र गोचर वाढवणार डोकेदुखी; आर्थिक हानी होण्याचा धोका

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

Weather Update : थंडीची चाहूल, कमाल अन् किमान तापमानात घट

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

SCROLL FOR NEXT