IPL Loksabha Election Connection: KKR जिंकली आता देशात सत्तांतर होणार? काय आहे सत्तेच्या समीकरणांचं IPL कनेक्शन?

IPL Predication On Loksabha : लोकसभा निवडणूक आणि आयपीएलच्या स्पर्धांमुळे देशात धुराळा उडाला. आता सोशल मीडियाच्या जाणकारांनी केकेआरच्या विजयाचा संबंध थेट लोकसभा निवडणुकीशी लावत सत्ता बदलाचे संकेत दिलेत.
IPL Loksabha Election Connection: KKR जिंकली आता देशात सत्तांतर होणार? काय आहे सत्तेच्या समीकरणांचं IPL कनेक्शन?
IPL Loksabha Election Connection

प्रसाद जगताप, साम प्रतिनिधी

मुंबई :

देशातील सार्वत्रिक निवडणुकीचा अंतिम टप्पा १ जूनला पार पडणार असून लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जूनला लागणार आहे. यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याचे तर्क-वितर्क आता लावली जात आहेत. देश-विदेशातील जाणकार आपला तर्क काढत कोणाचे सरकार येणार हा अंदाज वर्तवत आहेत. सोशल मीडिया ते राजकीय पटल या सर्व पातळीतील लोक आपल्या अंदाज वर्तवत आहेत. यादरम्यान आयपीएल आणि लोकसभा निवडणुकीचा संबंध लावत सोशल मीडियामधील काही जाणकारांनी देशात सत्ता बदल होणार असल्याचं भाकीत केलंय.

लोकसभा निवडणूक आणि आयपीएलच्या स्पर्धांमुळे देशात धुराळा उडाला. आयपीएलचे सामने आणि लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी एकाचवेळी सुरू झाल्याने देशातील वातावरण तापलं होतं. देशात एका बाजुला राजकारणी लोकांचा प्रचार सुरू होता तर दुसऱ्या बाजुला आयपीएलच्या सामन्याचा थरार सुरू होता. रोचक ठरलेल्या आयपीएलचा अंतिम सामना केकेआरने जिंकला. त्यानंतर काही सोशल मीडियाच्या जाणकारांनी केकेआरच्या विजयाचा संबंध थेट लोकसभा निवडणुकीशी लावत सत्ता बदलाचे संकेत दिलेत.

संकेत आले कसे ते पाहू

2014 साली म्हणजे बरोबर 10 वर्षापूर्वी शाहरुखच्या कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल टायटलचा खिताब पटकवला. आणि त्यानंतर देशात लगेचच सत्ताबदल झाला. आता 2024 सालीही पुन्हा एकदा केकेआरच जिंकलीये, मग आताही सत्ताबदल होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. 2009 साली आरसीबी प्लेऑफमध्ये क्वालीफाय झाली. आणि त्यानंतर काँग्रेस सत्तेत आली.

यंदाही आरसीबी क्वालीफाय झाली होती. मग आताही कॉंग्रेस सत्तेत येईल? 2014 साली चेन्नई सुपर किंग आयपीएल हरली. आणि भाजप सत्तेत आलं. 2019 लाही सीएसके हरली आणि भाजपच सत्तेत आलं. आता 2024ला पण सीएसके पुन्हा एकदा हरलीये. मग पुन्हा एकदा भाजपच सत्तेत येईल? अरेरेरे हे लॉजिक आम्ही नाही. तर नेटकऱ्यांनी लावलेत.क्रिकेटचा पॉलिटीक्सशी संबंध जोडून काही नेटकऱ्यांनी भन्नाट लॉजिक लावलेत.. तेच लॉजिक आणि त्यामागचे अर्थ पाहण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत पहावा लागेल.

क्रिकेटचा पॉलिटीक्सशी संबंध जोडून वेगवेगळे राजकीय अर्थ काढणारा हे मॅसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेत. या मॅसेजमध्ये लिहलंय की, 2014 ला शाहरूख खानच्या केकेआरने आयपीएल जिंकली आणि देशात राजकीय सत्तांतर झालं होतं. असे कितीतरी मॅसेज आणि मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झालेत. ज्यातून असं सांगितलं जातंय की, 2014 साली केकेआर आयपीएल जिंकली आणि देशात सत्तांतर झालं. आता 2024लाही केकेआर आयपीएल जिंकलीये मग आताही होईल? केकेआर आत्तापर्यंत 2012, 2014 आणि 2024 अशा तीन वेळा आयपीएल टायटल जिंकलीये.. 2014 ला देशात लोकसभा निवडणुका होत्या.

या निवडणुकीत देशात मोदी लाट होती. याच लाटेने सत्तातर केलं, काँग्रेसचं पानीपत करत भाजप सत्तेवर विराजमान झालं. नेमकी तीच पुनरावृत्ती या वेळी होईल? देशात पुन्हा एकदा सत्तांतर होईल का? म्हणजे मोदी सरकारला सत्तेवरुन पायउतार करावा लागेल का? असा प्रश्न या लॉजिकवरुन नेटकरी विचारतायेत.

आता हे दुसरं लॉजिक पहा..

2009 साली रॉयल चॅलेंजर्स बंगलोर प्लेऑफमध्ये क्वालिफाय झाली. आणि कॉंग्रेस सत्तेत आलं. 2014 साली आरसीबी प्लेऑफमध्ये क्वालीफाय नाही झाली आणि भाजप सत्तेत आल. 2019 सालीही आरसीबी प्लेऑफमध्ये क्वालीफाय नाही झाली आणि भाजप सत्तेत आलं. आता 2024 साली आरसीबी पुन्हा एकदा प्लेऑफमध्ये क्वालिफाय झालीये, मग कॉंग्रेस पुन्हा एकदा सत्तेत येईल?

IPL Loksabha Election Connection: KKR जिंकली आता देशात सत्तांतर होणार? काय आहे सत्तेच्या समीकरणांचं IPL कनेक्शन?
Share Market: लोकसभेच्या निकालावर ठरणार शेअर मार्केटचं गणित; बाजार गडगडणार की उसळणार?

बरं हे सगळे लॉजिक फक्त काँग्रेसच्या बाजूने आहेत असं नाही. भाजपच्या बाजूने लॉजिक लावणारं हे मीम्स देखील शेअर झालेत. 2014 साली चेन्नई सुपर किंग आयपीएल हरली आणि भाजप सत्तेत आलं. 2019 लाही सीएसके हरली आणि भाजपच सत्तेत आलं. आता 2024ला पण सीएसके पुन्हा एकदा हरलीये. मग पुन्हा एकदा भाजपच सत्तेत येईल? आयपीएल टीमवरुन लोकसभा निवडणुकांच्या निकालांच्या प्रेडिक्शनचा हा सिलसिला फार मोठा आहे. आता तुम्हाला या लॉजिक बद्दल काय वाटतं? आणि यातून तुम्हाला सर्वात जास्त आवडलेलं लॉजिक कोणतं? हे नक्की सांगा.

IPL Loksabha Election Connection: KKR जिंकली आता देशात सत्तांतर होणार? काय आहे सत्तेच्या समीकरणांचं IPL कनेक्शन?
Gold Rate On Election: निवडणुकीनंतर सोन्याचे भाव का वाढतात? यावेळीही दरात विक्रमी वाढ होणार का?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com