जगातील कोणतीही मालमत्ता सर्वात सुरक्षित असेल तर ती सोने आहे. सोन्यात गुंतवणूक करणं कधीच तोट्यात जात नाही. निवडणुकीच्या काळात सोन्याला आणखी महत्त्व येत असते. ज्यावेळी निकाल लागत असतो, त्यावेळीही सोन्याच्या दरात वाढ होत असते. भारतात २००९ ते २०१९ या काळात झालेल्या लोकसभा निवडणुकांनंतर सोन्याच्या किमतीत वाढ झालीय.
वर्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. २००९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधी सोन्याच्या दरात अशा प्रकारची वाढ कधीच पाहण्यात आली नव्हती. देशातील २००९, २०१४, आणि २०१९ प्रमाणे २०२४ च्या निवडणुकीच्या काळातही सोन्याचे दर वाढणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
२००९ मध्ये काय होता सोन्याचा दर
२००९ मध्ये लोकसभेच्या निवडणुकीनंतर सोन्याचे दरात वाढ झाली होती. तर निवडणूक सुरू होण्याआधी मार्च महिन्यात सोन्याचे दर २.३७ टक्के कमी झालेत. त्यानंतर एप्रिल महिन्यात निवडणुका सुरू झाल्या आणि सोने ४.१६ टक्क्यांनी स्वस्त झाले. त्यानंतर मे महिन्यात सोन्याच्या दरात २.९० टक्क्यांनी तेजी आली. पण त्यानंतर जून महिन्यात सोन्याच्या दरात पुन्हा घसरण झाली आणि गुंतवणूकदारांना ५० टक्क्यांहून अधिक तोटा सहन करावा लागला.
निवडणुकीच्या काळात म्हणजेच एप्रिल आणि मे महिन्यात सोन्याच्या दरात ०.१२ टक्के आणि ३.३५ टक्क्यांची घसरण झाल्याचं दिसून आलं. त्याच्या पुढच्या महिन्यात म्हणजेच जुलैमध्ये सोन्याच्या दरात वाढ झाली होती. सोन्याच्या किमतीत २.४३ टक्क्यांनी वाढ झाली. नोव्हेंबर महिन्यापर्यंत ही वाढ सातत्याने दिसून येत होती. नोव्हेंबर २०१९ मध्ये सोन्याने गुंतवणूकदारांना १०.३७ टक्के परतावा दिला. जूनपासून सोन्याच्या दरात ३२०० रुपयांची वाढ झाली होती. संपूर्ण वर्षात सोन्यात गुंतणूकदारांना २२.४२ टक्के परतावा दिला होता.
२०१४ मध्ये झाली कमाल
सोन्याच्या गुंतवणूकदारांसाठी २०१४ हे वर्ष काही खास नव्हतं. संपूर्ण वर्षभरात गुंतवणूकदारांना सोन्यापासून सुमारे १८ टक्के तोटा सहन करावा लागला. मात्र निवडणुकीनंतर सोन्याने गुंतवणूकदारांना श्रीमंत करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. मे महिन्यात निवडणुकीचे निकाल आल्यानंतर सोन्याने जून महिन्यात गुंतवणूकदारांना ८ टक्क्यांनी परतावा दिला होता.
तर जुलै महिन्यात हा परतावा अगदीच नाममात्र दिसला होता. पण काहीतरी नफा गुंतवणूकदारांना दिसत होता. कारण त्यानंतर नोव्हेंबरपर्यंत सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत राहिली. जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत सोन्याच्या दरात सुमारे १० हजार रुपयांची घसरण झाली होती. तर जून महिन्यापूर्वी म्हणजेच निवडणुकीच्या काळात आणि त्यापूर्वी सोन्याच्या किमतीत घसरण झाली होती.
२०१९ च्या निवडणुकीनंतर सोन्याने २०१४ पेक्षा चांगला परतावा दिला. विशेष म्हणजे सोन्याने संपूर्ण वर्षभरात गुंतवणूकदारांना २० टक्क्यांहून अधिक परतावा दिला होता. निवडणुकीपूर्वी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात सोन्याच्या दरात घसरण झाली होती. तर निवडणुकीच्या काळात म्हणजेच एप्रिल आणि मे महिन्यात अनुक्रमे १.६८ टक्के आणि ५ टक्के घसरण झाली होती.
म्हणजेच या चार महिन्यांत सोन्याच्या दरात सुमारे ४००० रुपयांची घसरण झाली. निवडणुकीच्या निकालानंतर सलग तीन महिने सोन्याचा भाव २.७५ टक्क्यांनी वाढला. जुलै महिन्यात सोन्याच्या किमतीत १०.०८ टक्के तर ऑगस्ट महिन्यात सोन्याच्या किमतीत १३.४६ टक्क्यांनी वाढ झाली होती. या तीन महिन्यांत सोन्याच्या भावात १० हजार रुपयांनी वाढ झाली होती.
२०२४ मध्ये गेल्या ५ महिन्यांत सोन्याच्या गुंतवणूकदारांमध्ये १७.७८ टक्क्यांनी वाढ होतेय. जानेवारी आणि फेब्रुवारी हे महिने सोडले तर सोन्याच्या दरात कमालीची वाढ झालीय. मार्च महिन्यात सोन्याने गुंतवणूकदारांना ८.१७ टक्के परतावा दिला आहे. एप्रिलमध्ये ४.०५ टक्के वाढ झाली. मे महिन्यात आतापर्यंत सोन्याने गुंतवणूकदारांना ५.७२ टक्के परतावा दिला. आता निवडणुकीनंतर सोन्याच्या दरात वाढ होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. तज्ज्ञांच्या मते सोन्याच्या किमतीतील वाढ कायम राहू शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.